ब्रम्हपुरी तालुक्यातील बाेडधा येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी,सचिन बदन यांची निवड.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०४/१०/२४ तालुक्यातील बाेडधा येथे ३० सप्टेंबरला ग्रामसभेचे आयाेजन करण्यात आले.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच्या मनिषाताई झाेडगे ह्या हाेत्या.तसेच उपसरपंच दिपक पाटिल ठाकरे,सदस्य उसन ठाकरे,काेकीळाताई हुलके,मंगेश बांबाेळे आदी उपस्थित हाेते.
या ग्रामसभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली व बरेच ठराव मंजूर करण्यात आले. तसेच विकासात्मक कामाचे नियोजन करण्यात आले.यानंतर बाेडधा येथील ग्रामिण पत्रकार सचिन बदन यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
सचिन बदन हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.ते पत्रकारितेच्या माध्यमातूनही परिसरातील समस्यांना वाचा फाेडीत असतात.त्यांच्या या निवडीबद्दल सरपंच्या मनिषाताई झाेडगे व उपसरपंच दिपक पाटिल ठाकरे यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी सी.एन.पाटिल,अरूण ठाकरे राेजगार सेवक,जितेंद्र ठाकरे,दुर्योधन ठाकरे,कैलास ठाकरे,भक्तदास ठाकरे,महेश काेटगले,विकास ठाकरे,प्रेमदास ठाकरे,पुरूसाेत्तम साखरे,वसंत लाेणारे, आदी उपस्थित हाेते.