नियोजन व सातत्यपूर्ण अभ्यासाने करियर घडविता येते करियर कट्टा मार्गदर्शन कार्यशाळा. - डॉ.युवराज मेश्रामांचे प्रतिपादन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०८/१०/२०२४ " आजचे जग एक बाजारपेठ आहे.या बाजारपेठेत प्रत्येकाला आपले कौशल्य सिद्ध करावे लागते.आपल्यात कौशल्य असेल तर जग तुम्हांला मानते.मोठया पदासाठी फार मोठे परिश्रम घ्यावे लागते.परिस्थिती बिकट असेल तर तुम्हांला प्रचंड मेहनतीने उभे व्हायचे असते,ती आपल्यासाठी चालून आलेली संधी असते.नियोजन व सातत्यपूर्ण अभ्यासाने करियर घडविता येते." असे बहूमोल मार्गदर्शन डॉ युवराज मेश्रामांनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात करिअर कट्टा मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.एच गहाणे तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर, डॉ राजेंद्र डांगे,डॉ रेखा मेश्राम, डॉ.मिलिंद पठाडे उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ गहाणेंनी, विद्यार्थ्यांनी आपले नामांकन करुन शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा.गरिबी शाप नाही तर एक वरदान आहे असे समजून सकारात्मक विचार करावा ,असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक डॉ.पद्माकर वानखडे,संचालन डॉ.मिलिंद पठाडे तर आभार डॉ विवेक नागभिडकरांनी आभार मानले.कार्यक्रमाला डॉ.धनराज खानोरकर, )डॉ.अतुल येरपुडे, डॉ.सुनील चौधरी, इ मान्यवर उपस्थित होते.यशस्वीतेसाठी जितू,विजू यांनी परिश्रम घेतले.