ब्रम्हपुरी विधानासभा क्षेत्रात छोट्या मोठ्या पक्षा च्या उमेदवारांची गर्दी होणार ? ★ तर कुणबी लांबीचा उमेदवार सापडेना..!

ब्रम्हपुरी विधानासभा क्षेत्रात छोट्या मोठ्या पक्षा च्या उमेदवारांची गर्दी होणार ?


तर कुणबी लांबीचा उमेदवार सापडेना..!


 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रासाठी छोट्या मोठ्या पक्षाचे डझनभर उमेदवार निवडणुक लढण्यास इच्छुक असुन मात्र सदर क्षेत्रात कुनबी लांबीचा पट्टा असतांना सुद्धा कुणबी लॉबीचा माणुस उभे राहण्यास धजत नसल्याचे चित्र दिसते. 


कारण महाविकास आघाडी तर्फे कांग्रेस चे विरोधी पक्ष नेते,विजयभाऊ वडेट्टीवार यांची उमेदवारी घोषीत करण्यात आली.असुन एवढ्या मोठ्या बल्यांढ तन मन धनानी श्रेष्ठ असणाऱ्या व ' विकासाचा माहामेरू च्या विरोधात उभे राहणे म्हणजे वाघासमोर उंदिर अशी अवस्था झाली आहे. 


भाजपा कडे माजी आमदार प्रा.अतुल देशकर तुल्यबळ उमेदवार होता परंतु प्रा. देशकर यांना वनविकास महामंडळावर वर्णी लावून " घे शिरणी राय गुपचुप " चा प्रयोग भाजपा ने केलेला दिसतो. 


भाजपा कडे दुसरे आमदार,परिणय फुके नागपूर व प्रशांत वाघरे गडचिरोली जिल्हाध्यक्ष भाजपा आहेत परंतु ते बाहेर जिल्ह्यातील असल्यामुळे अडचण येणार असे भाजपाला वाटते.


भाजपाचे अविनाश पाल प्रबळ दावेदार आहेत तरी  म्हणत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीत सदर जागेवर शिवसेना शिंदे गटाची मागणी असल्याचे वाटते कारण मागील निवडणुकीत युतीने शिवसेना चा उमेदवार संदिप गड्डमवार सावली यांना उमेदवारी दिली होती. 


संदीप गड्डमवार सध्या कांग्रेस च्या खेम्यात गेले असले तरी ही मात्र संदीपभाऊ सदर उमेदवार शिवसेनेची तिकीट मला मिळावी म्हणून मुंबई च्या वाऱ्या करीत असल्याने कळते.भाजपा - कांग्रेसला सह देणारी रिपब्लिकन पार्टीची शक्ती व काम  कार्य या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर असुन सदर क्षेत्रात ४०% टक्के एस.सी.ची मते आहेत.जी आता पर्यत कांग्रेसच्या झोळीत जात होती. 


या वेळेस मात्र रिपाई रिपब्लिकन युती मधे आपला उमेदवार देणार म्हणुन खोरीपाचे प्राचार्य,देवेश कांबळे  रिपाई नेते,अशोक रामटेके यांची बैठकीत चाचपणी केली परंतु प्राचार्य कांबळे यांना असे वाटते की ब्रम्हपुरीत उभे राहण्यापेक्षा अर्जुनी - मोरगांव अनु.जाती प्रवर्गातुन आपले नशीब अजमावणार आहेत तर अशोक रामटेके हे चिमुर विधानसभा क्षेत्रात वंचीत कडे उमेदवारी मागत आहेत. 


इंजि.उराडे हे सुध्दा भाजपा किंवा कुणबी लांबी कडून उभे राहण्यास ईच्छुक असल्याचे दिसतात तर भाजपा कडे तिकीट मागण्यासाठी अविनाश पाल,वसंत वारजुरकर,निकुरे तर कुनबी लॉबी कडून सुप्रसिद्ध तथा ब्रम्हपुरी क्षेत्रात परिचित व कार्य करणारे अँड.संजय ठाकरे यांची धडपळ व दौरे ही सुरु असुन ते जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असले तरीही रिपाई कडे तिकीट मागत असुन भाजपा तर्फे कुनबी लॉबीचा उमेदवार मिळाला तर ते माघार घेऊ शकतात. 


भाकप चे विनोद झोडगे हे कुनबी लांबीचे व भाजप - कांग्रेसला शह देणारे धुरंधर नेते आहेत परंतु भाकप हा महाविकास आघाडी चा घटक पक्ष असल्यामुळे भाकपला आघाडीतुन दोन जागा मिळण्याची शक्यता असल्यामुळे झोडगे पाटिल युती धर्म पाळणार आहेत. 


आबाजी समर्थ गडचिरोली हे सुध्या सदर क्षेत्रात परिचयाचे असल्यामुळे त्यांनी सुध्या रिपाई कडे तिकीट मिळावी म्हणुन प्रयत्नात आहेत. M I m कडून बाशिद शेख गडचिरोली तर रिपब्लिकन पार्टी आंबेडकर गटाचे,दिपक निकाळजे मुंबई यांच्या पार्टी तर्फे सुध्दा उमेदवार उभा राहणार आहे. 


तर वंचित कडूनही आयता उमेदवार मिळेल अशी आशा बाळगुन आहेत.तर बसपा नेहमी प्रमाणे आपला कोणताही उमेदवार उभा करणार आहेत. एकंदरीत डझनभर उमेदवार इच्छुक असुन खरी लढत कांग्रेस - भाजपात च होणार हे निश्चित परंतु वंचित - रिपाई कोणाचा गेम करणार हेहि विचारात घेण्यासारखे आहेत सध्या तरी सदर क्षेत्रात कुणबी लॉबीचा उमेदवार ठाम पणे उभे राहणाऱ्यासाठी घाबरत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !