अ-हेरनवरगांव येथील सुरज मदनकार ठरला टॅग लाईन चा विजेता.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,२९/१०/२४ जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारे महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप व्होटर अवेअरनेस प्रोग्राम च्या अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित करून विविध प्रकारचे आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहेत.सदर स्पर्धेतील दुसऱ्या आठवड्यामध्ये टॅगलाईन सुचवा ही स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेसाठी रुपये दहा हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या स्पर्धेतील निकाल जाहीर होऊन विजेता म्हणून
अ-हेरनवरगांव येथील सुरज मदनकार यांनी लिहिलेली कर्तव्याची ठेवुनी जाण चला करूया सर्वांनी मतदान या टॅग लाईनची निवड करून माननीय जिल्हाधिकारी श्री विनय गौंडा चंद्रपूर यांच्या शुभहस्ते रुपये दहा हजाराचे बक्षीस सुरज मदनकार यांना देण्यात आले.
टॅगलाईन स्पर्धेत विजेतेपदाचा मानकरी ठरल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि आप्त परिवार,मित्रपरिवार व गावकऱ्यांनी त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला आहे.अ-हेरनवरगांव वासियांसाठी हा एक गौरवाचा सन्मान आहे असे जनमानसात बोलल्या जात आहे.