भामरागड येथे तहसील कार्यालयावर वर विविध मागण्या घेऊन रणरागणी भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांच्या उपस्थितीत.
★ भामरागड चे कार्यकर्ते चंदू बेझेलवार यांच्या नेतृत्वाखाली व शेकडो महिला व नागरिक निवेदन देताना उपस्थित.
चंदू बेझेलवार - तालुका प्रतिनिधी,भामरागड
भामरागड : अहेरी विधानसभेचे रणरागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम,हलगेकर यांच्या नेतृत्वात आज 8. ऑक्टॉबर ला सकाळी ठीक 11:00 वा.मोर्चा तहसील कार्यालय, भामरागड येथे शेकडो च्या संख्येने आदिवासी बांधव व महिला उपस्थित होते.माजी जि.पं.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी नेतृत्व केले आहे.
भामरागड हा अतिमागास व आदिवासी तालुका असून कोणतेही विकास कामे अध्याप स्वतंत्र्यापासून पोहचलेले नाहीत एकीकडे भारत अमृत महोत्सव बनवत आहे तर दुसरी कडे समस्याचे डोंगर उपस्थित झालेलेआहे. या परिसरात आरोग्याची महासमस्या आहे, दवाखाना आहे, परंतु वेळेवर डॉ,उपलब्ध नाही, कधी,कधी औषधी पुरवठा समस्या उद्धभ वत असतात.
हे सर्व विविध मागण्या घेऊन अहेरी विधानसभेची रणरागणी भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांनी आपल्या आदिवासी बांधवावर होणारा अन्याय, हत्याचार खपवून घेणार नाही. वेळ भासल्यास मोठा आंदोलन उभारु मी नेहमी जनतेशी पाठीशी उभा राहून आदिवासी जनतेवर अन्याय, हत्याचार होऊ देणार नाही.
यावेळी माजी जि.पं.सदस्य ऋषी भाऊ पोरतेट आपल्या मनोगतात म्हटलं की, महाविकास आघाडी सरकार घेतललं निर्णय चुकीचा असून,पेसा कायद्या अंतर्गत नोकर भरती करण्यात यावे. अश्या अनेक विविध मागणी घेत आज भामरागड येथे भव्य धडक आक्रोश मोर्चा घेण्यात आले आहे.
या वेळी ऋतुराज हलगेकर, जहीर हकीम यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करीत घोषणा भाजी करण्यात आले आहे. यावेळी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नानोटी साहेब यांचा पोलीस प्रशासनाला घेऊन जन आक्रोश मोर्चा शांततेत कार्यक्रम पार पाडण्यात भाग पाडले आहे.
श्रीनिवास विरगोंवार,श्रीनिवास चटारे,संतोष येमूलवार, अमोल मुक्कावार,भामरागड चे कार्यकर्ते चंदू बेझेलवार, महेश मद्देलवार, दशरथ सुनतकर, अरुण रामटेके, शैलेश गेडाम, सलय्या कंबलंवार, विजय बोरकर, उमेश कोरेत, रमेश आत्राम, अजय कोरेत, प्रवीण गावडे, जयश्री सुनतकर, माजी जिल्हा परिषद सदस्या, कौशिकताई, या वेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.