अ-हेरनवरगांव येथे वाल्मिकी ऋषी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
★ उच्च शिक्षणाचा स्वतः दिवा बनुन दुसऱ्यांना प्रकाशित करा. - मान.डॉ दिलीप भाऊ शिवरकर यांचे मनोगत.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : अ-हेरनवरगांव दिनांक,१९/१०/२०२४ वाल्मिकी जयंती उत्सव समिती,ढीवर समाज अ-हेरनवरगांव च्या वतीने वाल्मिकी ऋषी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या जयंती चे अध्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर यांनी बक्षीस वितरक नेताजी मेश्राम माजी सभापती व प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक API शितल खोब्रागडे पोलीस स्टेशन, ब्रह्मपुरी, मेजर अरुण पिसे पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी,देवानंद तुलकाने, मुख्या जिल्हा परिषद शाळा,प्राध्या, डॉ. महेशजी ठेंगरे आणि प्रमुख अतिथी प्रशांतजी बगमारे, विजय नान्हे, जितेंद्र क-हाडे उपसरपंच, वामनराव मिसार ,मिलिंद भन्नारे , पत्रकार प्रशांत राऊत, प्राध्या. मंगेश देवडगले, नथुजी चांदेकर, मोतीरामजी जनबंधू ,सुधीरजी शिवुरकर या प्रमुख अतिथींनी सुद्धा माल्यार्पण करून महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष,डॉ.दिलीप भाऊ शिवरकर यांचा या प्रसंगी शाल, श्रीफळ देऊन धर्मा जराते व कार्यकर्ते यांच्या हाताने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे बक्षीस वितरक नेताजी मेश्राम व प्रमुख अतिथी यांनी गणेशोत्सव प्रसंगी सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक शिवरकर म्हणाले की, ढीवर समाजातील मुला, मुलींनी उच्च शिक्षणाने एक दिवा होऊन स्वंय प्रकाशित व्हावे आणि त्यानंतर आपल्या समाजाच्या इतर मुला, मुलींना प्रकाशित करून जीवनातील, कुटुंबातील अंधार उच्चशिक्षणाने, नोकरीच्या माध्यमातून दूर करून विकसित व्हावे.
कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका ए.पी.आय.शीतल खोब्रागडे यांनी आजच्या अठरा वर्ष वयाखालील मुला मुलींनी प्रेम प्रकरणात पडून लग्न करू नये कारण भविष्यात अनेक मुला मुलींची स्वप्ने हे तुटून पडतात आणि नाईलाजाने पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दाखल करण्यात येते. आज पर्यंत पोलीस स्टेशनला प्रेमविवाह संबंधातुन झालेल्या लग्नाची ताटातूट करण्यासाठी अनेक गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. मुला मुलींची लग्न 21 व 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच करावे.तसेच एखाद्या मुलाने छेळखाणी केली असता पोलीस स्टेशन क्रमांक 112 वर संपर्क साधण्याचे त्यांनी यावेळेस मार्गदर्शन उपस्थित ढीवर समाजाच्या बंधू भगिनींना केले.
सदर कार्यक्रम यशस्वी च्या पार पाडण्यासाठी धर्मा जराते, मंगेश जराते व महर्षी वाल्मिकी उत्सव समिती चे पदाधिकारी आणि समस्त ढीवर समाज यांनी अविरत परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह भोजनाचा कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरदीप लोखंडे , व आभार विष्णू रुईकर यांनी मानले.