गडचिरोली विधानसभा क्षेत्रात बि.जे.पी. - कांग्रेस मध्ये उमेदवारांची गर्दी ; कोणाला तिकीट मिळेल याची उत्सुकता.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात बि.जे.पी. - कांग्रेस मध्ये उमेदवारांची गर्दीकोणाला तिकीट मिळेल याची उत्सुकता.


 मुनिश्वर बोरकर  - कार्यकारी संपादक


गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रात कांग्रेस तसेच भाजपा मध्ये उमेदवारांची गर्दी असुन कोणाला तिकीट मिळेल याची उत्सुकता मतदारापेक्षा उमेदवारामधे जास्त दिसत आहेत. कांग्रेस पक्षात उत्सुक उमेदवार म्हणुन माजी मंत्री, मारोतराव कोवासे यांचे सुपुत्र विश्वजित कोवासे, माजी मंत्री कोवासे हे कांग्रेसचे निष्ठावंत जेष्ट नेते असुन ते आपल्या मुलाला तिकीट मिळावी म्हणुन त्यांची दिल्ली वारी सुरु आहे.


 माजी उपाध्यक्ष जि.प.गडचिरोली मनोहर पोरेटी हे शांत स्वभावाचे कांग्रेस चे एकनिष्ठ म्हणुन आपल्यालाच तिकीट मिळावी म्हणुन प्रयत्न सुरू आहेत.


साहित्यीक कुसुमताई आलाम यांची वरची लांबी जोरदार असुन त्या कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्यासोबत सतत संपर्कात आहेत.


डॉ.सोनल कोवे हे आपले नशीब आजमावणार की काय सर्वांचे लक्ष वेधले आहे.सदानंद ताराम,हे आदिवासी नेते असुन शिक्षकी पेशातून मलाच उमेदवारी मिळावी या प्रयत्नात आहेत. 

वर्षा आत्राम ह्या नवख्या उमेदवार असुन सुद्धा यांचा प्रचार दौरा सुरु असुन त्यांचे पती मंत्रालयात असुन ते आपल्या पत्नीलाच तिकीट मिळावी म्हणुन त्यांच्या मुंबईत हालचाली सुरु आहेत. 


डॉ.धुर्वे हे सुध्दा कांग्रेसची तिकीट मिळावी म्हणून इच्छुक आहेत.आपल्यालाच तिकीट मिळावी म्हणुन उमेदवारांच्या प्रमुख शर्यतीत विश्वजित कोवासे,मनोहर पाटिल पोरेट्टी व साहित्यिक कुसुमताई आलाम हेच प्रबळ दावेदार असल्याचे सर्वत्र बोलल्या जात असून ह्या तिघाच्याच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. 


भाजपाचे आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस च्या बरोबरीच्या पहिल्या यादित आरमोरी विधानसभेचे आमदार,कृष्णा गजबे यांना उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटात अस्वस्था निर्माण झाली आहे. 


गडचिरोली विघानसभेची उमेदवारी जाहीर करतांना भाजपाचे वरिष्ठ नेते सावधानपणे उमेदवारांची निवड करणार त्यामुळे गडचिरोली विधानसभेच्या उमेदवारांची निवड करतांना लोकसभेचा उमेदवार अशोक नेते यांना ऐनवेळी तिकीट दिली होती.म्हणुन विधान सभेच्या उमेदवारांची निवड करतांना तिसऱ्या यादित जवळपास २७ तारिख लागू शकते वेट अँड वॉच अशी चर्चा आहे.


दि.२१ ला माजी खासदार,अशोक नेते यांच्या घरी भाजपाचे वरिष्ट नेते येत असुन यात भाजपामधे गडचिरोली विधानसभेसाठी मातबर,तगडे उमेदवारांची फौज आहे. 


यात माजी आमदार डॉ.देवराव होळी,माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,डॉ.मिलिंद नरोटे , डॉ. नितिन कोडवते,डॉ.चंदा कोडवते आदि उमेदवार तिकीटाच्या शर्यतीत आहेत. 


यापैकी भाजपाला एकाची निवड करतांना सावधान तेचा पवित्रा आहे.कारण भाजपाचा उमेदवार निवडून येण्याची हमखास खात्री भाजप वाल्यांना आहे.यात माजी खासदार अशोक नेते हे तिकीट वाटपात प्रमुख भुमीकेत असल्यामुळे त्यांचा वरदहस्त कांग्रेस मधून भाजपवासी झालेले जनतेत प्रसिद्ध व हुशार नेतृत्व डॉ.नामदेव उसेंडी यांना लाभला.


डॉ. नामदेव उसेंडी आपले नशीब आजमावून बगू शकतात.डॉ. मिलिंद नरोटे हे आर.एस.एस च्या वरदहस्ताने तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्शीवाद दिलाच तर विकासाचे महामेरू सतत भाजपाच्या कार्यक्रमात व्यस्त असणारे डॉ. देवराव होळी हे आपले नशिब अजमावू शकतात.


 सध्यातरी भाजपाच्या जिल्ह्या नेत्यामधे डॉ. होळीचा विरोध होतांना दिसत आहे. डॉ. कोडवते दांपत्य सुध्या प्रयत्नात आहेत .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !