व्याहाड बुज.येथे जी.प.शाळेला शिक्षक द्या. - पालक संघाची मागणी.
सुदर्शन गोवर्धन - ग्रामीण प्रतिनिधी,सावली
सावली : तालुक्यातील व्याहाड बूज. हे गाव तालुक्यात लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे गाव आहे . येथे नवभारत विद्यालय हे इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत हायस्कूल तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षण विद्यार्थी घेत असतात. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे सध्या घडीला २७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.आणि याच शाळेला १ मुख्याध्यापक तथा ९ सहाय्यक शिक्षक एवढे पदे मंजूर आहेत.
मात्र सध्या येथे ७ सहाय्यक शिक्षक कार्यरत असून मुख्याध्यापक सहित २ सहाय्यक शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.येथील इयत्ता १ ल्या वर्गाला ६५ विद्यार्थी शिकत असून शिक्षकाच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन व्याहाड बूज. येथील पालक कमिटी यांनी दिनांक १८ ऑक्टोंबर ला पंचायत समिती सावलीचे संवर्ग विकास अधिकारी श्री वासनिक साहेब यांना शिक्षक नियुक्त करण्याची मागणी घेऊन साधक बाधक चर्चा करण्यात आली असून संवर्ग विकास अधिकारी यांनी पुढील आठवड्यात एक शिक्षक नियुक्त करण्यात येईल असे आश्वासन कमिटीला दिलेले आहे .
संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देताना व्याहाड बूज.येथील सामाजिक कार्यकर्ते,अनिल गुरनुले,पालक संघाचे अध्यक्ष,संभाजी मेश्राम,पालक संघाचे,प्रकाश गेडाम,प्रशांत सुत्रपवार,ज्ञानेश्वर बोलिवार,रूपाली भोयर , पूनम पोटे,अक्षय घोटेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.