आरमोरी विधानसभा कांग्रेस शिवसेना तु - तु मै - मै ; भाजपाचे मात्र एकमेव उमेदवार. ★ शिवसेनेची मशाल कॉंग्रेस हातात धरणार काय ?

आरमोरी विधानसभा कांग्रेस शिवसेना तु - तु मै - मै ; भाजपाचे मात्र एकमेव उमेदवार. 


शिवसेनेची मशाल कॉंग्रेस हातात धरणार काय ? 


 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : सद्या विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरु असुन सर्वच राजकिय पक्ष जोमाने कामाला लागले असले तरी गडचिरोली जिल्हयातिल तिनही विधानसभा क्षेञ मागासवर्गीय जनजातिच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या 3 विधासभा क्षेञात आदिवासी समाजातिल धनदांडगे उमेदवारांनी आपली कंबर कसली असुन पक्ष श्रेष्टींनी जरी आपल्या स्तरावर विविध पक्षांची मोटबांधनी केली असली तरी मीच खरा उमेदवार म्हणून मतदारांचे मन आकृष्ठ करण्यासाठी ताट्या वाट्या कटोरे बनियानी वाटुन आपले प्राबल्य सिद्ध करतांना दिसत आहेत.


असे असले तरी यात सर्वात मोठी डोकेदुखी महाविकास आघाडी साठी आरमोरी विधानसभेत दिसुन येणार आहे शिवसेना उबाठा  व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली प्रबळ दावेदारी ठोकल्यामुळे शिवसेनेची मशाल हातात धरण्याची तयारी कॉंग्रेस करु शकेल काय हाच प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

                  

गडचिरोली - चिमुर लोकसभा मतदार संघात देवरी - आमगांव,ब्रम्हपुरी - चिमुर,अहेरी - गडचिरोली व आरमोरी अशा ६ विधानसभा क्षेञाचा समावेश असुन मविआ चे घटक पक्ष असलेल्या देवरी क्षेञात कॉंग्रेस चे सहसराम कोरेटी हे विद्यमान आमदार आहेत.त्यामुळे हा क्षेञ त्यांच्यासाठीच सोडण्याची तयारी मविआ ने केल्याचे समजते ब्रम्हपुरी विधानसभा क्षेञात कॉंग्रेसचे विद्यमान आमदार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार यांना मविआ च्या घटक पक्षांनी निर्विवाद पणे सोडावेच लागेल.


चिमुर विधानसभा क्षेञात भाजप चे बंटीभाऊ भांगडीया यांना आव्हान देण्यासाठी डॉ,सतिष वारजुरकर शिवाय दुसरा पर्याय नाही ते कॉंग्रेसचे आहेत.अहेरी विधानसभेत विद्यमान मंञी,धर्मराव बाबा आञाम हे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे असल्याने त्यांना शह देण्यासाठी मविआ चे शरद पवार यांनी आञामांची कन्या भाग्यश्री आञाम यांनाच थेट मैदानात उतरविल्याने बारामती लोकसभेच्या निवडनुकित जे चिञ पहायला मिळाले.


तेच चिञ अहेरी च्या माध्यमातुन पहावयास मिळणार आहे गडचिरोली विधानसभेत डॉ.देवराव होळी हे भाजप चे विद्यमान आमदार असुन त्याठिकाणी शिवसेना किंवा राष्ट्रवादी चे मोठे प्राबल्य नसल्याने तो मतदारसंघ परंपरागत कॉंग्रेसचा राहिल्याने तो कॉंग्रेसलाच सोडावा लागेल,आरमोरी विधानसभेत भाजपचे क्रिष्णा गजबे हे दोन टर्म चे आमदार असुन तिसऱ्या निवडुन येण्यासाठी त्यांना ही मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.


आज पर्यंत या क्षेञात कोणताच आमदार तिसर्यांदा निवडुण आला नाही हे विशेष,तरीही महायुतीत मधील ते भाजपाचे एकमेव उमेदवार आहेत हि त्यांच्या जमेची बाजु आहे.शिवसेनेचे हरीरामजी वरखेडे हे आमदार होते.माञ ते राष्ट्रवादीत गेले शिवसेनेने डॉ.रामकृष्ण मडावी यांना संधी दिली ते सलग दोन वेळा निवडुन आले.नंतर माञ ते दोन 4 वेळा सतत पराभुत झाले.कॉंग्रेस चे आनंदराव गेडाम हे 2 टर्म सलग आमदार राहिले.


माञ त्यानंतर २ टर्म त्यांनाही पराभव पत्करावा लागला. क्रिष्णा गजबे दोन टर्म सलग आमदार राहिले असुन ते तिसर्यांदा आपले भाग्य आजमावित आहेत माञ खरी रस्सीखेच कॉंग्रेस व शिवसेना उबाठा यातच पहावयास मिळत असुन लोकसभा निवडनुकित महाराष्ट्रात मोठे यश प्राप्त झाल्याने 


व या क्षेञातिल विद्यमान खासदार हे कॉंग्रेस चे असल्याने कॉंग्रेसचे मनोबल वाढल्याने आनंदराव गेडाम डॉ.शिलु चिमुरकर  रामदास मसराम यांचेसह सेवानिवृत्त उपआयुक्त,माधुरी मडावी छगन सेडमाके माधव गावंढ यांचेसह तब्बल २२ उमेदवारांनी कॉंग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी जमेल ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतांना दिसत आहेत.


सुरवातीला आरोग्य शिबिर,बनियान थैली वाटप यात रामदास मसराम यांनी आघाडी घेतली माञ सर्वच उमेदवार एकञ येवुन काम करुन पक्ष संघटन मजबुत करावे अशी सुचना वरिष्ठांकडुन होताच कोरची कुरखेडा जनसंवाद याञेत आनंदराव गेडाम रामदास मसराम गडचिरोली शहरातील आरमोरी विधानसभेसाठी आपले नसीभ उजमावून पाहणाऱ्या माधुरी मडावी यांचेसह काही इच्छुक कॉंग्रेस उमेदवारांनी एकञ येवुन जनसंवाद याञेत सहभाग घेतला पक्ष नेञूत्व ज्याला तिकीट देईल.


त्याचे काम करु अशी संयमी भुमिका घेत आनंदराव गेडाम यांनी आपल्या उमेदवारीचे आव्हान माञ कायम ठेवले डॉ.शिलु चिमुरकर यांनी या सर्वांच्या पुढे जात एकट्याच्या बळावर जनसंवाद याञा काढली पक्षाचे तालुकाअध्यक्ष सहयोग करत नाही असा आक्रमक सवालही त्यांनी उपस्थित केला आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन डॉ शिलु चिमुरकर यांनी देसाईगंज च्या नप सांस्कृतिक भवनात भव्यदिव्य महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन केला होता.


जवळपास ३ हजार महिला कार्यक्रमात काहितरी मिळणार आहे या आशेने कार्यक्रमात दाखल झाल्य माञ साध्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन नसल्याने महिंलामध्ये केस धरुन मारहान केल्याच्या घटना घडल्या दुसरी विशेष बाब म्हणजे अल्पोपहार ही सर्व उपस्थित महिलांना मिळाला नाही त्यामुळे प्रचंड रोष निर्माण झाला तिसरी महत्वाची बाब म्हणजे महिलांचा सन्मान करण्यासाठी डॉ.शिलु चिमुरकर यांनी वाढदिवसाची थेट भेट म्हनुण कटोरा  चे वाटप सुरु केले कटोराचे वाटप होतांना पाहुन उपस्थित नसलेल्या महिला ही कटोरा मिळविण्यासाठी कार्यक्रम स्थळी दाखल झाल्या.


भिड वाढण्याचे चिञ पाहुन माझ्याकडे बचत गटांच्या माध्यमातुन उपस्थित झालेल्या महिलांची यादी प्राप्त झाली आहे तुमचा कटोरा तुमच्या घरी पोहचता केला जाईल असे आश्वासन देत डॉ.शिलु चिमुरकर यांनी कार्यक्रमातुन काढता पाय घेतला.


एकटेपणे केलेली जनसंवाद यात्रा कार्यक्रमात पिण्याच्या पाण्यावरुन महिलांनी केस धरुन केलेली मारहान आणि महत्वाचे म्हणजे महिला सन्मान म्हनुण महिलांना वाटप केलेला कटोरा तो ही निवडकच लोकांना मिळाला यामुळे झालेली पक्षाची बदनामी यावर उमेदवारी सबंधाने डॉ शिलु चिमुरकर यांचेवर असलेली टांगती तलवार आव्हान संपुष्टात आणु शकते असे असले तरी आपल्यालाच उमेदवारी प्राप्त होण्यासाठी रामदास मसराम यांनी केलेला खर्च हा ही चर्चेचा विषय असला तरी आनंदराव गेडाम यांनी संयमी भुमिका घेत तिकिट मिळविण्यासाठी दिलेले आव्हान.


मनपा च्या उपआयुक्ताची प्रशासकिय सेवेतुन घेतलेली स्वेच्छा निवृत्ती छगन सेडमाके यांचे आंदोलने डॉ.मेघा सावसाकडे यांनी वडिल वामनराव सावसाकडे यांनाच कॉंग्रेस ने उमेदवारी द्यावी यासाठी सुरु ठेवलेली झुंज आदिवासी नेते तथा माजी इंजिनिअर माधव गावढ ची पोष्टरबाजी व पत्रके यासह इतरही उमेदवारांचे सुरु असलेले प्रयत्न पाहता या आरमोरी विधानसभा क्षेञात तिन वेळा प्रतिनिधीत्व प्राप्त केलेल्या शिवसेनेची मशाल  आपल्या हातात धरुन शिवसेना उबाठालाच तिकिट मिळाल्यास मिञ पक्ष म्हनुण कांग्रेस प्रामाणिक सहकार्य करतिल.


काय अश्या  गंभिर प्रश्नाने आरमोरी विधानसभेत कॉंग्रेस व सेनेत डोकेदुखी वाढली असुन शिवसेना उबाठाला तिकिट न मिळाल्यास विशाल पाटिल पैटर्न राबविण्याची तयारी ही शिवसेनेने सुरु केली असुन कॉंग्रेस चे २२ पैकी किती इच्छुक उमेदवार मैदान सोडतात यावरही निवडुकीचे चिञ अस्पष्ट असुन कोणत्या घडीला कोणता पक्ष काय निर्णय घेते याकडे मतदारांचे लक्ष लागलेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !