गडचिरोली जिल्हयात पद भरती करतांना स्थानिकांना प्राध्यान द्या. - तनुश्रीताई आत्राम
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील विविध कार्यालयातील पद भरती स्थानिक बेरोजगारांकडूनच करण्यात यावी यात बाहेर जिल्हयातील लोकांना घेण्यात येऊ नये कारण जिल्ह्यातच सुशिक्षीत बेरोजगार आहेत. तेव्हा पोलीस भरती , तलाटी , वनरक्षक ' सुरजागड प्रकल्प व इतर कार्यालयात होणारी पद भरती यापुढे स्थानिकांना प्राध्यान्य देऊनच पदभरती करावी.
अन्यता आदिवासी बेरोजगार युवक आंदोलन करणार अश्या प्रकारची माहिती गडचिरोली ऑल मिडिआ असोशिएशन (गामा ) च्या पत्रकार परिषदेत गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली च्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त व अतिदुर्गम असुन या जिल्हयातील युवा बेरोजगारांना स्वतःचा हक्क मिळालाच पाहिजे , हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच ! क आणि ड गटातील सर्व पदे स्थानिक उमेदवाराकडूनच भरण्यात यावी.
बाहेरील जिल्हयातील नोकरी करणारे एक दोन वर्षात अनेक कारणे पुढे करून आपल्या जिल्हयात बदल्या करतात . बाहेरील जिल्हयातील क .व .ड पदे भरल्या जात आहेत त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांची संख्या दिवसा गणीत वाढतच आहे . बाहेरील जिल्ह्यातील लोकांना गडचिरोली जिल्हयाची भौगोलिक परिस्थिती माहीत नाही अश्या परिस्थितीत जिल्ह्यातीलच बेरोजगारांना संधी घ्यावी. एखादया संस्थेला काम घ्यायचे असेल तर जिल्हयातीलच कॉन्ट्राकदारांना कामे घ्यावे व त्यांनी जिल्हयातील बेरोजगारांना प्रथम प्राध्यान घ्यावे.
यापूर्वी झाले ते झाले परंतु यापुढे असे होता कामा नये अन्यता जिल्हयातील आदिवासी बेरोजगार युवक पेटून उठून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. अशी माहीती तनुश्री आत्राम यांनी दिली. पत्रकार परिषदेला संतोषी सुत्रपवार शुभम सर , राहुल भांडेकर , राठोड महेंद्र लटारे , प्रकाश आंबोरकर , मनोज पिपरे , अनिल मुनघाटे , विकास किरमे ' संजय सोमनकर , सुर्यकांत बारसागडे ' कार्तिक टिकले चिरजिंव कोडागुरले ' गोपाल उसेंडी , नितिन दुर्गे सहीत बहुसंख्य बेरोजगार युवक प्रामुख्याने हजर होते '