महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भोसले) येथे मतदार जागृतीसाठी चित्रकला,निबंध तथा रांगोळी स्पर्धेचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदान करण्याची इच्छा प्रकट व्हावी , कोणताही मतदार मतदान करण्यापासून वंचित राहू नये यासाठी मतदान जनजागृती साठी ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव (भोसले )येथे रांगोळी, निबंध तथा चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
सदर स्पर्धेचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे तर प्रमुख अतिथी म्हणून सन्मा.सचिन क-हाडे सर ,पुरी सर ,नाकाडे सर ,मेश्राम सर, गावडकर सर, महाले सर घ्या राऊत मॅडम विचार पिठावर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी उपस्थित गावकऱ्यांना मतदानाचा अधिकार जो राज्यघटनेने दिला आहे तो अधिकार प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे कोणीही मतदानापासून वंचित राहता कामा नये.जो व्यक्ती जिवंत असूनही मतदान करीत नाही त्याची गणना मेल्या माणसात होत असते.