चंद्रपूर तालुक्यातील विविध शाळा, विद्यालय आणि मॅजिक बसच्या संयुक्त विद्यमाने आंतर राष्ट्रीय बालिका दिन संपन्न.
एस.के.24 तास
चंद्रपूर : मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील शाळा, विद्यालयामध्ये विद्यार्थांना जीवन कौशल्य व फुटबॉल ह्या खेळाचे कौशल्य बालकांमध्ये आत्मसात व्हावे यासाठी काम करत आहे.
याच निमित्ताने मॅजिक बस आणि प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुग्गुस, जि प उच्च प्राथमिक शाळा गोंडसावरी, पिंपळखुट, नागाळा, अजयपुर , चीचापल्ली, दाताळा, खुटाळा, वरवट, बोर्डा, मारडा मोठा व जनता विद्यालय पिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.
यावर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दीन 2024 ची थीम गर्ल्स व्हिजन फॉर द फ्युचर आहे. त्याकरिता मुलींचे ऐकणे आणि तिच्या क्षमता पूर्ण करण्याकरिता विविध उपाययोजना करणे जेणेकरून ती स्वतःची प्रगती करेल. हा दिवस सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय क्षेत्रात पूर्ण सहभाग सुनिश्चित करण्याच्या तत्त्वावर जोर देऊन मुलींच्या क्षमतेचा उत्सव साजरा करतो आणि त्यांच्या हकांचे समर्थन करतो.
त्यानिमित्ताने शाळांमध्ये मुलींच्या विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच गावात मुलींनी *बेटी बचाओ बेटी पढाओ* या विषयावर नाटिका सादर करून गावातील नागरिकांमध्ये जनजागृती केली.
त्याचप्रमाणे मुलींची वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य, संरक्षण, मुलींचे हक्क, लआजीविका इत्यादि विषयावर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा चाईल्ड लाईन, जिल्हा सखी वन स्टार सेंटर, तालुका आरोग्य विभाग, गावातील अंगणवाडी सेविका, आशा,शिक्षिका इत्यादीनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विविध शाळांच्या 443 मुलींनी सहभाग घेतला.
आंतरराष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वरील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विविध विभागाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री प्रशांत लोखंडे, तालुका समन्वयक हिराचंद रोहनकर, जीवन कौशल्य शिक्षक संदेश रामटेके, शुभांगी रामगोनवार, चंदन मसारकर आणि प्रशिक्षक रविशंकर प्रसाद व मुस्कान शेख ह्यांच्या सहकार्याने पार पडले.