ब्रम्हपूरी मतदार संघाचा विकास बारामती पेक्षाही अधिक सरस ठरणार. - विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार
★ हळदा येथे गांगलवाडी - व्याहाड रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपुजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : विधानसभा क्षेत्रातील सर्व अंतर्गत रस्ते, प्रशासकिय कार्यालयांच्या प्रशस्त इमारती या पुर्णत्वास आल्या असुन जे विकासकामे बाकी असतील ते देखील लवकरच पुर्ण होणार आहेत. खोटारड्या भाजपकडून आपल्या अपयशावर पांघरून घालण्याकरिता माझ्या बाबत फेक नरेटिव्ह पसरवण्यात येत असून अशा कुरघोडीखोरांना उत्तर देण्यासाठीच
ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत बारामती मतदारसंघा पेक्षाही अधिक सरस ठरणार असे महत्वपूर्ण प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रम्हपूरी तालुक्यातील हळदा येथे आयोजित गांगलवाडी-व्याहाड (अंदाजित किंमत २६२ कोटी, जिएसटी वगळून) रस्ता बांधकामाच्या भुमीपुजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार मारोतराव कोवासे, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर
माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार,शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, विजय मुत्यालवार, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, सावली काॅंग्रेस तालुकाध्यक्ष नितीन गोहणे, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, सावली नगराध्यक्ष लता लाकडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, किशोर कारडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, सावली महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष उषा भोयर , कंत्राटदार आदित्य गुरुबक्षानी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मागील सत्ता काळात या रस्त्या करिता मंत्री असताना मंजुरी दिली मात्र सत्ता परिवर्तनानंतर नव्या सरकारने या मार्ग निर्मिती कामावर स्थगिती आणली.
आणि आता जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे हेतू भाजपाकडून खोटे आरोप केले जात असून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राच्या विकासासंदर्भात दम असल्यास पुढे येऊन विरोधकांनी सामना करावा व जनता दरबारात चर्चा करावी असे खुले आवाहनही विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी याप्रसंगी दिले. तर दहा वर्षे आमदार राहून आपण काय दिवे लावले...?
असा टोलाही त्यांनी माजी भाजप आमदार अतुल देशकर यांना लगावला. एकीकडे राज्यातील महिलांवर अत्याचारांच्या घटनेत प्रचंड वाढ होत असताना दुसरीकडे लाडकी बहीण योजना राबवून महिला भगिनींच्या कुटुंबांच्या आर्थिक उत्पन्नावर महागाईचा बोजा लादून लूट करणाऱ्या सरकारच्या दुटप्पी व लुटारु धोरणाचे पितळ उघडे पडल्याचेही विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगीतले.
तर भाजप व घटक पक्षाच्या महायुती सरकार काळात देशात व राज्यात चाललेल्या प्रचंड भ्रष्टाचार व वाढलेली महागाई, बेरोजगारी यावर सरकारला धारेवर धरत देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करणाऱ्यांना सत्तेतून पायउतार करा असे आवाहन यावेळी चिमूर - गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजेश कांबळे यांनी सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी केले.तर आभार नितीन गोहने यांनी मानले.आयोजित कार्यक्रमास ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील हजारो संख्येने नागरिक उपस्थित होते.
ब्रम्हपूरी शहरातील भुमीगत गटार बांधकामाचे भूमिपूजन संपन्न : -
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मंजूर 130 कोटी रुपयांच्या निधीतून ब्रम्हपूरी शहरात भुमीगत गटाराचे बांधकाम होणार आहे. या विकासकामाचे भुमीपुजन आज पार पडले. यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपूरी शहरातील नागरिकांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देतांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील लोकप्रतीनीधी म्हणून माझे कर्तव्य आहे.स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ब्रह्मपुरी नगरी नावलौकिकास यावी हाच माझ्या कारकीर्दीतील सर्वांगीण विकासाचा ध्यास आहे.