बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस कडून संतोषसिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : महाविकास आघाडीच्या विदर्भातील काही विधानसभा क्षेत्रात उबाठा,राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागावाटपाचा पेच निर्माण झाला होता.दरम्यान बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची जागा उबाठाला सुटल्याची बातमी वाऱ्यासारखी धडकल्यामुळे उबाठा मध्ये उत्साह तर काँग्रेस मध्ये प्रचंड नाजारीचे सूर उमटतांना दिसले.
त्यामुळे मुंबई-दिल्ली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकांना उधाण आले. मातोश्री आणि शरद पवार यांच्या कडे सुद्धा तिन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले.
अखेर सामोपचाराने महाविकास आघाडीत काँग्रेस ८५ उबाठा ८५ आणि राष्ट्रवादी ८५ असा तोडगा निघाला तसेच उर्वरीत जागा मित्र पक्षांसह काँग्रेस आणि उबाठाने सामोपचाराने वाटून घेण्याचे ठरविण्यात आले.
अखेर बैठकांचा सिलसिला संपला आणि बल्लारपुर विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या वाट्याला आले.काँग्रेसच्या सीईसीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचा अनुभव बघता इलेक्टिव्ह मेरिट आणि पक्षातील राजकीय कारकीर्द बघता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
बल्लारपुर मतदार संघात भाजपाचे हेव्हीवेट नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात महाविकासआघाडी प्रणित काँग्रेसचे संतोषसिंह रावत अशी तगडी लढत असली तरी अपक्ष उमेदवारांची सुद्धा डोकेदुखी वाढण्याची मोठी शक्यता आहे. अपक्ष उमेदवार किती मते घेतात आणि ती नेमकी कोणाची मते घेतात यावर सुधीर मुनगंटीवार आणि संतोषसिंह रावत यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्यांच्यावर विधानसभा क्षेत्रात असलेल्या नाराजीचा आणि भाजपाच्या दुहीचा फटका बसण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलल्या जाते.तसेच महाविकास आघाडीकडे लोकसभेच्या विजयाचा उत्साह उत्फुर्त पणे वाहतांना दिसून येत असल्यामुळे बल्लारपुर विधानसभा निवडणूक रंजतदार होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.