कापूस पिक शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन.
एस.के.24 तास
सावली : कापुस उत्कृष्ठ उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण तालुक्यातील व्याहाड नर्सरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे संशोधक श्री सोडे , श्रीमती इंगळे यांनी कापूस पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान,अन्नद्रव्य व्यवस्थापन,धान व्यवस्थापन,एकात्मिक कीड व्यवस्थापन, काढणी,काढनीत्तर व्यवस्थापन तसेच विक्री व्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तर मंडळ कृषी अधिकारी सावली श्री.दिनेश पानसे यांनी विभागाचे विविध योजना, किटकनाशके, फवारणी या बाबत घ्यावयाची काळजी, फळबाग,महाडिबिटी, रब्बी हंगामात घेतले जाणारे पिक हरभरा, गळीत पिके, तृणधान्ये इत्यादी बाबत नवनव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासंबधाने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन कृषी पर्यवेक्षक सचिन जाधव यांनी तर गौतम मेश्राम,पवन ठाकरे, प्रदीप जोंधळे, योगेश टेकाडे,तृप्ती कटरपवार, चेतली दुधे, लक्ष्मी ढोंगे, अक्षय ठीकरे सर्व कृषी सहायक यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गौतम मेश्राम यांनी केले.सावली तालुक्यातील कापूस उत्पादक बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.