मी आमदार झाल्यास पहिले काम अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन अधिकाऱ्यांवर लगाम लावणार. - संतोषसिंह रावत अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,चंद्रपूर
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : माझे शिक्षण B.COM काम पूर्ण झाले त्यानंतर मूल शहरांमध्ये आम्ही व्यायाम शाळा काढली आणि त्यातून सामाजिक कार्य चा प्रवास सुरू झाला.सामाजिक कामे करीत असताना अनेकांनी नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सुचविले आणि मी नगराध्यक्ष झालो. नगराध्यक्ष असताना बरीच कामे आपण केली.
मला देश सेवेत आवड असल्याने मिल्ट्री मध्ये जाण्याचे माझे स्वप्न होते.मात्र काही कारणास्तव मी जाऊ शकलो नाही त्यामुळे मग सामाजिक काम करत असताना राजकारणात प्रवेश झाला आणि मी राजकारणात आलो असे एका प्रश्नाचे उत्तर देताना रावत यांनी सांगितले.
1995 ला मुल कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती झालो.1998 ला मुल नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो.चितळे क्षेत्रातून जिल्हा परिषदेत करिता उभा राहिलो आणि 2007 ला निवडून आल्यानंतर 2017 पर्यंत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पदी राहिले.
यावेळी विविध विकास कामे करत जिल्हा परिषद शाळेला आणि मीच भेट द्यायचे. शिक्षकांवर नजर ठेवून शिक्षकांना कामाला लावले आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्षपदी असताना विविध अनुभव आल्याचे रावत यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तोट्यात असतानाही 2020 ते 23 पर्यंत चॅलेंज स्वीकारून बँकेचा अध्यक्ष पद स्वीकारला.
यावेळी शेतकरी कल्याण योजना सुरू केली.राजीव गांधी स्वावलंबी योजना च्या माध्यमातून गरजू गरिब, छोट्या व्यवसाय काम करिता कर्ज दिले.महिला बचत गटाला योजना दिली.असे विविध योजना बँकेच्या माध्यमातून आपण राबवीत असतो अशी माहिती दिली.
रावत यांनी माझ्यावर झालेला गोळीबार हा आयुष्यातील कठीण प्रसंग असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचार याविषयी त्यांनी बोलताना पॉर्न व्हिडिओ वर बंदी आणली पाहिजे त्यातून भावना तयार होऊन विविध उपद्रव होत असतात यावरही त्यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा न मिळाल्याने त्यासाठी आम्ही कोर्टात गेलो असल्याची माहिती रावत यांनी दिली.