मुल येथे शेतकऱ्यांच्या हजारो संख्येच्या उपस्थिती धरणे आंदोलन.
■ सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणा विरोधात संघर्ष करा. - संतोषसिंह रावत
मिथुन कलसार - प्रतिनिधी
मुल : दिनांक,०४ ऑक्टोबर २०२४ मागील २०२३-२४ वर्षातील शेतक-यांच्या खरीप व रब्बी पिकांची फार मोठी नुकसान झाली होती. १४ हजार शेतक-यांनी पी.एम. पिक विमा योजनेचा विमा काढलेला होता.शेतीचे नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचवेळेस काँग्रेसने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात पीक विमा मिळावा म्हणून शासनाकडे मागणी केली असता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व शासनाने ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत विम्याचे पैसे मिळतील असे जाहीर आश्वासन दिले होते.साक्षात खोटे ठरले.
शेवटी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासना विरुद्ध निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले. यात हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित झाले.त्यावेळी बोलतांना संतोषसिंह रावत म्हणाले की,आपल्याला न्याय हक्कासाठी संघर्ष करुन लढा दिल्याशिवाय आपले न्याय हक्क मिळणार नाही.अन्यथा पुढच्या पिढीला सत्ताधारी लोक गुलाम बनवतील असे संतोष सिंह रावत म्हणाले.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना संतोषसिंह रावत यांनी घरकुल,स्टॅम्प पेपर,महागाई, गॅस सिलेंडर,आईच्या दुधावर GST, विद्युत बिल वाढ, सिमेंट वाढ याबाबत सरकारला धारेवर धरले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनीही लोकसभेत सुधीर मुनगंटीवार यांना जसा पराभव स्वीकारावा लागला तसाच विधानसभेत पराभव स्वीकारावा लागेल असे मत व्यक्त केले.
कृषी बाजार समिती सभापती राकेश रत्नावार यांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध केला.मंचावर जिल्हा काँग्रेसचे महासचिव घनश्याम येनुरकर,राजू पाटील मारकवार, अखिल गांगरेड्डीवार,प्राचार्य बंडू गुरनुले,सरपंच प्रीती भांडेकर, हिमानी वाकुडकर,लीना फुलझेले,फर्जणा शेख, मुरली पाटील बेंबाळ व हजारो शेतकऱ्यांनी शासनावर व पालकमंत्र्यांवर टीका करीत तीव्र भावना व्यक्त केल्या. पीक विम्या संदर्भात न्यायालयीन दाद मागणीसाठी पुढील कार्यवाही बाबत ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. अजित लाभे साहेब यांनीही मनोगत व्यक्त केले.शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मुल यांचे मार्फत पाठविण्यात आले.
प्रास्ताविक मुल तालुका काँग्रेस कॅमेटीचे अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी शेकऱ्यांवर आलेली आपत्तीचे उदाहरण देत समजाऊन सांगितले. मंचावर बल्लारपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष,भास्कर माकोडे,पोंभुर्णा काँग्रेस अध्यक्ष वासुदेव पाल,ओमेश्र्वर पदमगिर्वार,अशोक गेडाम, बुरांडे, कृषी बाजार समिती संचालक संदीप कारमवार, किशोर घडसे,सुमित आरेकर, सूनील गुज्जनवार,लहू कडस्कर, योगेश शेरकी, चंदा कामडी, सभापती पुरुषोत्तम भुरसे, सीमा भासरकर, प्रशांत उराडे,युवक अध्यक्ष पवन निल्मवार,ओबीसी सेल गुरुदास चौधरी,रूमदेव गोहने, शांताराम कांमडे,
व्यंकटेश पुलकवार, सुरेश फुलझेले, अतुल गोवर्धन,संदीप मोहबे, महिला अध्यक्ष रुपाली संतोषवार,नलिनी आडपवार, शामला बेलसरे,समता बांसोड,अनेक ग्रा.पां.सरपंच, उपसरपंच,सोसायटी अध्यक्ष,सदस्य, कांग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते,असंख्य महिला,युवक मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन मुल शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुनील शेरकी यांनी केले.