चोरी करणारी आंतरराज्य टोळी ताब्यात ; ब्रह्मपुरी पोलीसाची कामगिरी
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक ०७/१०/२४ रोजी फिर्यादी प्रणय अनंत कुमार खेत्रे, वय २६ वर्ष रा.कूर्झा ब्रह्मपुरी यांनी पो.स्टे.ला रिपोर्ट दिला की,युनियन बँकेतून सकाळी ११-३० वाजे दरम्यान सहा लाख रुपये रक्कम काढून बँकेबाहेर येऊन मोटर सायकलने परत जात असताना अंगावर खाज लागत असल्याने मी मित्राच्या दुकानात जाऊन त्याला अंगावर पाणी टाकण्यास सांगितले असता मोटर सायकलवर आलेला एक लहान मुलगा दुकानात येऊन दुकानात ठेवलेली पैशाची थैली घेऊन पळून गेला.
त्याचा पाठलाग केला परंतु मिळाला नाही. त्यावरून फिर्यादीचें तोंडी रिपोर्ट वरून पो स्टे ब्रह्मपुरी येथे अपराध क्रमांक ४५५/२४कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला..
सदर आरोपीचा सी.सी.टी.व्ही.च्या आधारे पाठलाग करून आरोपीचे फोटो प्रसारित करून शोध घेतला असता आरोपी आमगाव जिल्हा गोंदिया पो.स्टे.हद्दीत मिळुन आल्याने आरोपी नामे : -
1) देवा नागप्पा पिटला,वय ४२ वर्ष
2) राजेश राजू पिटला, वय २० वर्ष
3) विधी संघर्ष बालक वय १२ वर्ष
तिन्ही रा.बॅटरीगुंडा,जिल्हा नेल्लूर, राज्य आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन, ब्रह्मपुरी येथे अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपी क्र. १ व २ पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून आरोपी कडून गुन्ह्यातील एकूण ७०,०००,००/- रुपये हस्तगत करण्यात आलेले आहे.
विधी संघर्ष बालक यास बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे.
नमूद आरोपीतांची आंतरराज्य टोळी असून त्यांनी महाराष्ट्रात जिल्हा गोंदिया, चंद्रपूर, ब्रह्मपुरी तसेच छत्तीसगड मध्य प्रदेश इतर राज्यात गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का सा. अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे,पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनात सहा.पो नि मनोज खडसे, पोहवा योगेश शिवणकर, नापोअ मुकेश गजबे, संदेश देवगडे, अजय कटाईत यांनी केलेली आहे.