गडचिरोली विधानसभा कांग्रेसचे मनोहर पाटिल पोरेट्टी यांना मिळाली उमेदवारी
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - गडचिरोली जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष कांग्रेसचे सक्रिय नेते शांत स्वभावाचे धनी जिल्हयात सर्वत्र परिचयाचे व्यक्ती मनोहर पाटील पोरट्टी यांना कांग्रेस पक्षातर्फे इंडिआ आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे नविन चेहरा म्हणुन कांग्रेसमधे उत्साह निर्माण झाला आहे . भाजपातर्फे नविन चेहरा डॉ. मिलिंद नरोटे यांची उमेदवारी जाहीर होताच कांग्रेसनेही नविन चेहरा युवा नेता म्हणुन सर्वाच्या परिचयाचे व्यकी मनोहर पाटिल पोरेट्टी यांना उमेदवारी दिली .
गडचिरोली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार विश्वजित मारोतराव कोवासे ' साहित्यीक कुसुमताई अलाम , वर्षा आत्राम, डॉ. कोवे आदिची नावे आघाडीवर होती . शेवटी कांग्रेस श्रेष्ठीने मनोहर पाटील पोरेट्टी यांना उमेदवारी बहाल केली . मनोहर पाटिल पोरेट्टी हे आपल्या असंख्य कार्यकर्त्या सोबत उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत .