सावली तालुक्यात १७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन. ★ विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश - अंतर्गत रस्ते, सामजिक सभागृहांचा समावेश.

सावली तालुक्यात १७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन.


 ★ विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश - अंतर्गत रस्ते, सामजिक सभागृहांचा समावेश. 


एस.के.24 तास


सावली : क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीकोन, जनतेच्या मूलभूत समस्या सोडविण्याची धडपड, आणि विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून ब्रह्मपुरी मतदार संघात आजवर कोट्यावधींची विकास कामे मंजूर झाली.



 व ती पूर्णत्वासही आली आहे. तर क्षेत्रातील उर्वरित रखडलेल्या रस्त्यांच्या नवनिर्माणासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नाने अर्थसंकल्प २०२३-२४ व २५१५ लेखाशिर्ष अंतर्गत १७.४५ कोटींच्या विकास निधीस मंजुरी मिळाली असून आज युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते सदर विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.


एक जागरूक व जनहितकारी कार्यासाठी कटीबद्ध असलेले कणखर नेतृत्व म्हणजे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे होय. त्यांच्या कारकीर्दीत संपूर्ण ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ना भूतो न भविष्यती असा विकास साधला गेला असून आजही त्यांच्या विकास कामांचा झंजावात जोमाने सुरू आहे. नुकताच त्यांनी शासन स्तरावर सततचा पाठपुरवठा करून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यांत  अर्थसंकल्प २०२३-२४ व  २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत १७.४५ कोटींचा विकास निधी मंजूर करून घेतला. 


यात सावली तालुक्यातील हिरापुर - बॉथली - पेंढरी - पाथरी प्रजिमा २७ रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करणे (अंदाजित किंमत ९ कोटी), कापसी - व्याहाड (बुज) ते मुल - गडचिरोली प्रजिमा - २८ रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करणे (अंदाजित किंमत ५ कोटी ), मौजा सामदा येथे बौद्ध समाज सभागृह बांधकाम करणे (२० लक्ष), वाल्मिकी समाज सभागृह (२५ लक्ष), सामदा (बुज) ते सोनापुर - भांसी रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करणे (अंदाजित किंमत ३ कोटी रुपये) अशा एकूण १७.४५ कोटींच्या विकास कामांचा समावेश आहे.


यावेळी मार्गदर्शनपर बोलताना युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दूर दृष्टिकोण आणि जनते प्रति असलेली तळमळ यामुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात नागरिकांच्या मूलभूत गरजांसह, सुसज्ज प्रवास मार्ग, सामाजिक उपक्रमाकरिता सभागृह, शेती सिंचनाकरिता बंधारे, गोसेखुर्द अंतर्गत कालव्यातून पाणीपुरवठा, शुद्ध पेयजल, क्रीडापटूंसाठी क्रीडा संकुल, युवकांसाठी व्यायामशाळा तसेच 


शिक्षणार्थी विद्यार्थ्यांकरीता ई - लायब्ररी ,वाचनालय, यासह अनेक अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील हा ऐतिहासिक विकास असून एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेला दिलेल्या वचनाची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वचनपूर्ती केल्याची यावेळी त्यांनी सांगितले.आयोजित भूमिपूजन सोहळ्यास माजी जि.प.बांधकाम सभापती दिनेश चीटनुरवार काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहने,महिला आघाडी अध्यक्ष उषा भोयर


माजी प.स.सभापती,विजय कोरेवार,आशिष मनबत्तुलवार, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, यांचे सह विविध गावातील ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक  उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !