प्रिती भंडारे ला राज्यस्तरीय शालेय वूशू क्रीडा स्पर्धेत कास्य पदक.
मिथुन कलसार - ग्रामीण तालुका प्रतिनिधी,गडचिरोली
मुल : क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय तथा जिल्हा क्रीडा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय वूशू क्रीडा स्पर्धेचे आयोजन नांदेड येथील जिल्हा क्रीडा संकुल इंडोअर हॉल मध्ये पार पडली सदर स्पर्धेमध्ये नागपूर, कोकण, पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागाचा सहभाग होता.
स्पर्धेत मूल येथील नवभारत कन्या विद्यालय ची प्रिती नीलकंठ भंडारे हिने 17 वर्ष आतील वयोगटात 45 या वजन गटात उत्तम खेळाचे प्रदर्शन करत कास्य पदक पटकावून मूल तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात नाव केला आहे वरील खेळाळू हे वूशू प्रशिक्षक निलेश गेडाम यांच्या मार्ग दर्शनात कराटे अँड फिटनेस क्लब मूल मध्ये वूशू चे प्रशिक्षण घेतात.
प्रिती च्या विजयावर नवभारत कन्या विद्यालय मूल चे मुख्यध्यापक तथा मुख्यध्यापिका, क्रीडा शिक्षक तथा अन्य शिक्षकवृंद आणि कराटे अँड फिटनेस क्लब मूल चे संचालक -प्रशिक्षक इम्रान खान तथा पालकवर्ग यांनी आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.