विदर्भात एकच लक्ष्य रिपब्लिकन ऐक्य ; रिपब्लिकन स्थापना दिनी धरणे आंदोलन संपन्न.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
नागपूर : रिपब्लिकन एकता स्थापना दिनानिमित् रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे या मागणी करीता विशाल धरणा आंदोलन कार्यक्रम संविधान चौक नागपूर येथे घेण्यात आला. या धरणे आंदोलनात विविध गटा-तटात विखरलेले रिपब्लिकन नेते.
कार्यकर्ते यांना एकाच व्यासपिठावर बसवून तुटलेले घर पुन्हा एकत्र करून राहण्यासाठी आंबेडकरी जनतेचे मनाचे विभाजन टाळावे लोकशाही गणतंत्र बळकट करावे याकरिता बहुनांश नेते मंडळी एकत्र आलेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय समन्वयक अशोक बोंडादे होते तर माजी आमदार उपेंद्र शेंन्डे,रमेश फुले,प्रा.एन.व्ही ढोके , अमृत गजभीये , दिनेश गोडघाटे ' प्रकाश कुंभे , डॉ. प्रदीप बोरकर , सहदेव गोडबोले ' प्राध्यापक सुरेश , रमेश पाटिल ' चंद्रशेखर ढेभुर्णे , रोशन जांभुळकर आनंदराव खोब्रागडे आदिनी आपापले विचार मांडले व रिपब्लिकन ऐक्य झाले पाहिजे.
अशा सुर निघाला. कार्यक्रमास रिपाईच्या विविध गटातील प्रमुख आशिष बागडे,उत्तम सहारे अनिल मेश्राम . ईश्वर सुर्यवंशी,संपतराव वंजारी,रेश्या भोयर,रेखा रामटेके आदि सहीत बहुसंख्य आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बाळूमामा कोसनकर यांनी तर आभार विश्वास पाटिल यांनी मानले.