तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यशोधरा विद्यालयाचे सुयश.
एस.के.24 तास
चामोर्शी : तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत यशोधरा विद्यालयाच्या 6 विद्यार्थ्यानी तालुक्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.कनिष्ठ महाविद्यालयीन क्रिडा शिक्षक प्रा. प्रशांत वालदे आणि हायस्कूल चे क्रीडा शिक्षक प्रविण नैताम यांच्या मार्गदर्शनात हे यश मिळविले आहे.
अंडर14.200मिटर आणि 400 मी दौड स्पर्धेत वर्ग 8 वीचा विद्यार्थी निशांत संदिप सोमनकर द्वितीय क्रमांक व अंडर14.100मिटर दौड स्पर्धेत वर्ग 7 वी ची विद्यार्थिनी कु. गायत्री संजय कुकडकर हीने द्वितीय क्रमांक पटकावला.
अंडर 17.800 मिटर दौड स्पर्धेत वर्ग 10वी चा विद्यार्थी संदिप शंकर चिचघरे द्वितीय क्रमांक व अंडर 17 गोळा फेक स्पर्धेत रोहित आनंदराव खोब्रागडे याने प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच अंडर 19 गोळा फेक स्पर्धेत वर्ग 12 वी ची विद्यार्थिनी कु. सिंधू शिवराम कंगाली ही ने प्रथम क्रमांक तर अंडर 19.400 मिटर दौड स्पर्धेत वर्ग 12वी ची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा परशुराम जूवारे ने द्वितीय क्रमांक पटकावला.
प्रभारी मुख्याध्यापक राजू धोडरे यांनी तालुक्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले .तसेच विद्यालयातील इतर शिक्षकवृंद प्रा. प्रवीण गव्हारे,प्रा.प्रदीप भांडेकर, सरिता वैद्य, जयश्री कोठारे , गुरु सातपुते,अमोल उंदीरवाडे, नवनियुक्त शिक्षक निलेश क्षीरसागर,आणि लोकनाथ दुधबळे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सुधाकर भोयर, लक्ष्मण गव्हारे,रुपलता शेंडे व शालेय मंत्री मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले.