अ-हेरनवरगाव येथे दुर्गा उत्सवा प्रित्यर्थ देवी जागरण संगीतमय कार्यक्रम संपन्न.

अ-हेरनवरगाव येथे दुर्गा उत्सवा प्रित्यर्थ देवी जागरण संगीतमय कार्यक्रम संपन्न.


★ मताची कडकी बहीण झाली लाडकी. - डॉ.सतीश भाऊ वारजूरकर 


अमरदीप लोखंडे : सहसंपादक


ब्रम्हपूरी : दिनांक,१०/१०/२०२४ एक गाव एक गणपती या मनीप्रमाणे अ-हेरनवरगाव येथे  संपूर्ण गावाच्या वतीने गावची कुलदैवत असलेली दुर्गा देवी ची स्थापना दुर्गा माता देवस्थान च्या वतीने केली जाते. 

आणि नऊ दिवस भजन, पूजन, पोवाडे, समाज प्रबोधनाचे , कला गुणांना वाव मिळावा म्हणून संगीत नृत्याचे व अन्य स्पर्धांचे कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन करून गाववासीय जनतेच्या आचार विचाराची देवाण-घेवाण करण्यासाठी मेळावा घेण्याचे कार्य दुर्गा माता देवस्थान करीत असते.

दुर्गा उत्सवाच्या निमित्याने गुलशन कुमार म्युझिकल ग्रुप गोंदिया च्या वतीने देवी जागरणाचा कार्यक्रम दुर्गा माता मंडळ अ-हेरनवरगावच्या आवारात करण्यात आला देवी जागरण या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्मा.प्रमोद  चिमूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य , चंद्रपूर यांनी अ-हेरनवरगाव च्या सरपंचा सौ. दामिनी ताई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन केले.



या मनोरंजनात्मक  व उद्बोधक कार्यक्रमाप्रसंगी  प्रमुख अतिथी माननीय डॉ सतीश भाऊ वारजुरकर समन्वयक चिमूर विधानसभा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक, अॅड हेमंत उरकुडे ब्रह्मपुरी, अकुल राऊत पोपा . अ-हेर नवरगाव, उमेश धोटे सरपंच ग्रामपंचायत चौगान, राजेश तलमले सरपंच ग्रामपंचायत सावलगाव, मोरेश्वर ठेंगरे, वामनरावजी मिसार, सुरेश दुनेदार सरपंच ग्रामपंचायत पिंपळगाव, गुड्डू बगमारे काँग्रेस उपाध्यक्ष पिंपळगाव, निहाल ढोरे रक्तवीर सेना , मोंटू पिलारे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष ,अमरदीप लोखंडे,ईश्वर कुथे, धनराज मेश्राम, आदी मान्यवर उपस्थित होते.


दुर्गा माता देवस्थान मंडळाच्या वतीने अ-हेरनवरगाव वाशीय जनतेसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर स्नेह भोजनाचा आस्वाद भक्तिमय, आनंदमय वातावरणात जनतेने घेतला.या भोजनदान कार्यक्रमासाठी मंडळाच्या सदस्यांनी व गावातील आबालवृद्ध वृद्ध , तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन स्नेहभोजन कार्यक्रम अगदी शांततेत पार पाडण्यास सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !