राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देते. - डाँ.आर.के.डांगे

राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देते. - डाँ.आर.के.डांगे


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम हे विद्यार्थी घडविण्याचे कार्य करते.विद्यार्थ्याच्या अनेक सुप्त गुणा बरोबरोर आत्मविश्वास त्याच्यात निर्माण करते. महाविद्यालयीन शिक्षण घेतांना त्याच्या कलागुणांना स्वत़ंत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणारा एकमेव हा राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम आहे. खर तर यामुळे विद्यार्थी घडत असतो. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्याच्या कलागुणांना एक प्रकारे वाव देते त्यांना संधी उपलब्ध करुन देते. 


आणि म्हणून  राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देणारा उपक्रम आहे. असे डाँ आर के डांगे यांनी मौलिक मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे आयोजित कार्यक्रमात विचार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ डी एच गहाणे होते. तर प्रमुख अतिथी म़हणून उपप्राचार्य डाँ सुभाष शेकोकर, रासेयो कार्यक्रमाधिकारी डाँ प्रकाश वट्टी व डाँ विवेक नागभिडकर विचारपीठावर उपस्थित होते.


यावेळी प्राचार्य डाँ.गहाणे यांनी समाज व देशासाठी लागणारा मनुष्यबळ हा राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमातून घडविण्यासाठी याची महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थ्यात हे राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती    मूल्याचेबीजोरोपण करता यावे. या उदात्त हेतुनी राष्ट्रीय सेवा योजना युनीटची स्थापना झाली आहे. त्याकरिता विद्यार्थ्यानी " माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी " हे ब्रीद घेऊन  समाज व देशासाठी काम करावे असे प्राचार्य डाँ डी एच गहाणे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. 


तसेच डाँ शेकोकर या़ंनी शुभेच्छा दिल्या. याकार्यक्रमाचे प्रास्ताविक  डाँ प्रकाश वट्टीनी केले सूत्रस़ंचालन स्वयंसेवक मगेश बगमारे तर आभार डाँ  विवेक नागभिडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज भोयर, मयूर ठेगंरी, अनिकेत शेंडे, मानस गेडाम, लोमेश लोहबंरे, कार्तिक गुरनुले, रोहीणी हजारे, शैलैश चुधरी, व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन निनाद बगमारे तर आभार डाँ  विवेक नागभिडकर यांनी मानले. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज भोयर, मयूर ठेगंरी, अनिकेत शेंडे, मानस गेडाम, लोमेश लोहबंरे, कार्तिक गुरनुले, रोहीणी हजारे, शैलैश चुधरी, व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !