राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी साखळी उपोषणाचा इशारा.


राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी साखळी उपोषणाचा इशारा.


एस.के.24 तास


गडचिरोली : राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्रात साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला.हे उपोषण राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय संरक्षक,वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. 


सघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, सोयाबिन,कापुस,यासह सर्व शेतमालाला राज्य कृषी मुल्य आयोगाने काढलेल्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा.शेतीचे सर्व थकित विजबिल शून्य करून शेतीला २४ तास मोफत विज मिळावी.


 प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना व शासनाला लुबाडून हजारो कोटी रुपये नफा कमावणाऱ्या पीक विमा कंपन्या बंद करून इर्मा (इंकम रिक्स मॅनेजमेंट अग्रीकल्चर) शेतीचे आर्थिक जोखीम व्यवस्थापन संकल्पनेवर आधारित कायदा व्हावा. शेती व शेतकरी विरोधी आंतरराष्ट्रीय गँट करारातून भारत सरकारने बाहेर पडावे.


या मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व ३६५ तालुक्यात निवेदन देण्यात आले.या मागण्या पूर्ण न झाल्यास २५ आक्टोबर ला संपूर्ण महाराष्ट्रात अनिश्चित काळासाठी बेमुदत साखळी उपोषण करण्यात येईल.

        

निवेदन देतेवेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयंत गेडाम,माजी नगरपरिषद सभापती,तुळशिराम सहारे, बहुजन मुक्ती पार्टीचे उपाध्यक्ष,शांतीलाल लाडे,एम.एन. टिव्ही चॅनलचे प्रमोद राऊत बामसेफचे जिल्हाध्यक्ष, भोजराज कान्हेकर उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !