ब्रम्हपुरी येथे संत नगाजी महाराज पुण्यतिथी संपन्न ; तालुक्यातील समाज बांधवाच्या उपस्थितीत अतिशय भक्ती भावपूर्ण वातावरणात पार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत नगाजी महाराज यांची २५८ वी पुण्यतिथी सोहळा तालुक्यातील हत्तीगोटा,कहाली - खंडाळा रोड, येथे ब्रम्हपुरी शहर व तालुक्यातील समाज बांधवाच्या उपस्थितीत अतिशय भक्ती भावपूर्ण वातावरणात पार पडला.
याप्रसंगी पार पडलेल्या समाजमेळावा प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री राजेंद्रजी इंगळे साहेब प्रमुख अतिथी रूपाने उपस्थित होते तर श्री विनायकराव शेंडे सर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. मनाम विदर्भ (पूर्व) विभागीय संघटक श्री धनराजजी गुंडलवार, नागपूर जिल्हा सचिव श्री विजय वालूकर, जिल्हा संघटक श्री रवींद्र नक्षणे सहित नाभिक युवा बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ खडसिंगे यावेळी मंचावर उपस्थित होते.
नेट परीक्षेत भारतात ७८ वा क्रमांक ज्युनिअर रिसर्च फेलोशिप प्राप्त करणारे चि.जयंत सूर्यवंशी यांच्यासह नगाजी महाराजांची अविरत सेवा करणारे पुजारी मा.सोमेश्वर दाणे,सुनील मेश्राम,श्रावन येळणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रबोधनपर मनोगतात प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेंद्र इंगळे यांनी नाभिकांचा गौरवशाली इतिहास विदित करीत, महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या स्थापने पासून राज्यभर पसरलेल्या संघटनेचे कार्य व महत्व समाजावून सांगत समाज संघटित ठेवून कार्य करण्याचे आवाहन उपस्थिताना केले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.राजेंद्रजी इंगळे यांचा ब्रह्मपुरी समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला.
म.ना.महामंडळ पूर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रा.डॉ.अशोकराव सालोटकर यांचे मार्गदर्शनात विदर्भ संघटक श्री घनश्याम सूर्यवंशी यांचे सह आनंदराव सूर्यवंशी, श्रावण येळणे, सोमेश्वर दाणे, सुनील मेश्राम, केवलराम सूर्यवंशी, दिलीप मेश्राम,संजय मेश्राम,सुनील पगाडे, भूषण सूर्यवंशी, धनंजय पगाडे, चंद्रकांत सूर्यवंशी, मयूर मेश्राम, प्रकाश पगाडे
पितांबर फुलबांधे, गोलू फुलबांधे, विकास दाणे तथा महिला आघाडीच्या रश्मी पगाडे, शुभांगी शेंडे, शालू फुलबांधे, अलका नंदापूरकर,रजनी सूर्यवंशी, कल्पना पोईनवार, मीना सूर्यवंशी, सुरेखा लांजेवार, शुभांगी मेश्राम, किरण सुर्यवंशी, वंदना मेश्राम, संगीता सूर्यवंशी, रोशनी सूर्यवंशी बबली सुर्यवंशी प्रा. लक्ष्मण मेश्राम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन श्री सुनील मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन महामंडळ पूर्व विदर्भ संघटक श्री घनश्याम सूर्यवंशी यांनी केले.जवळपास ४०० हुन अधिक समाजबंधवानी महाप्रसादाचा लाभ घेवून,कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.