महाराष्ट्र विद्यालय पिंपळगांव भोसले येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०२/१०/२०२४ रोज बुधवार ला महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगांव( भोसले) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली.या प्रसंगी विद्यालयात निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धां,भाषण स्पर्धां,तसेच विद्यालय व ग्राम स्वच्छता अभियान आयोजित करण्यात येऊन शालेय पटांगण व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
या कार्यक्रमा चे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.ओमप्रकाश बगमारे सर यांनी प्रमुख अतिथी मा.रुपेश पुरी सर सचिन क-हाडे सर,महाले सर,मेश्राम सर,गावडकर सर,घ्यार सर,सडमाके सर,नाकाडे सर,राऊत मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सर्व उपस्थित प्रमुख अतिथी, शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सुद्धा राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन क-हाडे सर यांनी उपस्थितांचे मानले.