महाविकास आघाडीने अभारिप ला विधान सभेच्या जागा घ्याव्यात. - प्रविण खोब्रागडे अभारिप

महाविकास आघाडीने अभारिप ला विधान सभेच्या जागा घ्याव्यात. - प्रविण खोब्रागडे अभारिप


 गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी ने उभ्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सहकार्य करून कांग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी कांग्रेसचे खासदार निवडून आणण्यात आमच्या पक्षाचा शिहांचा वाटा आहे.आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तेव्हा महाविकास आघाडीने आमच्या अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी ला १५ते १६ जागा घ्याव्यात अशी 


आमच्या पक्षाची मागणी असुन या संबंधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,शरद पवार,कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नानाभाऊ पडोले आणि शिवसेना चे उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रत्यक्ष भेटून बोलणी केलेली आहे. त्यांनी अभारिपच्या शिष्टमंडळाला होणार दिलेला आहे. अश्या प्रकारची माहीती अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पत्रकार परिषदेला अभारिप चे केंद्रिय उपाध्यक्ष रोहिदास राऊत,अशोक निमगडे,केंद्रिय सदस्य विलासचंद्र अलोणे,प्रदिप डोर्लीकर,ढेंभरे,घनश्यामजी फुसे,अभारिप चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर , गडचिरोली जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे सचिव प्रल्हाद रायपूरे , बोरकर,अरुण भैसारे,आदि उपस्थित होते. 


रोहिदास राऊत यांनी सांगीतले की आरक्षणाचे वर्गीकरण हे चुकीच धोरण आहे ते केंद्र शासनाने रद्द करावा,सरकारी संस्थेचे खाजगीकरण करू नये , कोणताही उध्योग हा खाजगी उद्योग नाही कारण शासन त्यांना सवलती देतो.आरोग्य विभागाने कोरोना काळात लोकांची लुट केली आहे आता खाजगी दवाखाणे सर्वासाठी खुले झाले पाहिजे.


कांग्रेसचे गेल्या 30 वर्षात कांग्रेसने रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याच गटाला विधानसभेच्या जागा सोडल्या नाही आता अभारिप पक्षाला महाविकास आघाडी जागा सोडणार काय ? असा प्रश्न बाळासाहेब खोब्रागडे यांना पत्रकारांनी विचारले असता महाविकास आघाडी सोबत चर्चा सुरु आहेत असे त्यांनी सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !