राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर येथे कु.भाग्यश्री वसाके ची निवड.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
नागभीड : चंद्रपूर जिल्ह्यातील राईस सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळोधी (बा.) सारख्या ग्रामीण भागातील तरुणी कु.भाग्यश्री भगवान वसाके हिने आपल्या अथक परिश्रम, जिद्द व चिकाटीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर या विभागात जवान (गट- क) या पदावर नियुक्त झाली.
ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण परिश्रम व योग्य मार्गदर्शनामुळे यशस्वी होऊ शकतात हे परत एकदा कु. भाग्यश्री वसाकेने सिद्ध केले आहे. आणि तिच्या यशाची प्रेरणा घेऊन परिसरातील विद्यार्थी भविष्यात असेच यश संपादन करत राहतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या यशाचे श्रेय तिने आई-वडील व स्वप्नझेप करिअर अकॅडमी चे मार्गदर्शक शिक्षक श्री. पराग मस्के, श्री. नितीन भेंडाळे, श्री. विकास अहिरकर यांना दिले. या यशामुळे तळोधी व संपूर्ण परिसरामध्ये भाग्यश्री चे कौतुक होत आहे.
त्या अनुषंगाने महात्मा फुले माळी समाज तळोधी (बा.) यांच्या वतीने सौ.प्रभाताई कैलास मोहूर्ले यांनी कु. भाग्यश्री हीचा सत्कार केला याप्रसंगी समस्त माळी समाज बांधव, भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.