विधानसभा मतदारसंघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षकांची नेमणूक.

विधानसभा मतदारसंघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षकांची नेमणूक.


एस.के.24 तास


गडचिरोली  : विधानसभा निवडणुक - 2024 ही शांततापुर्ण व भयमुक्त वातावरणात नि:पक्षपातीपणे पार पाडण्याकरीता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 


67 - आरमोरी विधानसभा मतदार संघाकरीता पोलीस ऑब्झर्वर म्हणून के. आरीफ हफीज  (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असुन, ते ते गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस गडचिरोली या ठिकाणी वास्तव्यास आहे. 


विधानसभा निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था संबंधात जनतेच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस या ठिकाणी  सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वाजे पर्यंत  श्री.के.आरीफ हफीज  यांची भेट घेवुन  तक्रार करावी अथवा त्यांचा मोबाईल नंबर 7588134720 यावर संपर्क करावा.


68 - गडचिरोली विधानसभा मतदार संघाकरीता पोलीस ऑब्झर्वर शासकिय निवडणुक निरीक्षक म्हणुन श्री.ह्यदयकांत (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असुन, ते गडचिरोली जिल्हयामध्ये हजर झालेले आहे.ते गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस गडचिरोली या ठिकाणी वास्तव्यास आहे. 


विधानसभा निवडणुक अनुषंगाने जनतेच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस या ठिकाणी सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वाजे पर्यंत व सायंकाळी 04.00 ते 06.00 वाजे पर्यंत श्री.ह्यदयकांत (भा.पो.से.) यांची भेट घेवुन  तक्रार करावी अथवा त्यांचा मोबाईल नंबर 9404306040 यावर संपर्क करावा.


69 - अहेरी विधानसभा मतदार संघाकरीता पोलीस ऑब्झर्वर म्हणून अनुपम शर्मा  (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असुन,  ते कर्तव्यावर रूजू झाले आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !