नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे पेंढरी मक्ता येथे आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील पेंढरी मक्ता येथे भूमिहीन शेतमजूर कॅन्सरग्रस्त असलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांना विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे पेंढरी मक्ता येथील काँग्रेस पदाधिकारी श्रीमती अंजुताई बोरेवार तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
मौजा.पेंढरी मक्ता येथील भूमीहिन शेतमजूर खुशाल मडावी वय ५८ वर्षे, गजानन मेश्राम वय ५० वर्षे,नंदू दिवाकर मेश्राम वय ३९ वर्षे तिन्ही कॅन्सर रुग्ण आहेत, मिडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
परंतु वारंवार तबेत खराब होत असल्याने उपचारदरम्यान डाक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले घरातील आर्थिक परिस्थिती ही अतिशय बिकट आहे. संकटाला समोरे जावे लागत आहे.त्यांना आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांना मिळाली.
माहिती मिळताच तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी पेंढरी येथे भेट दिली व विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना घटनेचे गांभीर्य सांगितले व सदर रुग्णास आर्थिक मदत मिळवून दिली,यावेळी पेंढरी येथील काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी मा.राकेश गड्डमवार,मा.जयंत गड्डमवार,मा.वसंत अल्लुरवार,मा.लखन मेश्राम,मा.नंदू दहिवले उपस्थित होते.