रिपब्लिकन चळवळीतील सुदामजी खोब्रागडे सिंदेवाही अनंतात विलीन शोकसभा.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
सिंदेवाही : रिपब्लिकन चळवळीतील खंदे समर्थक रिपाईचे जेष्ठ नेते सुदामजी खोब्रागडे ८० यांचे दि. १ . ऑक्टोंबर २०२४ सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुल व दोन मुली असून त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवास स्थानातून सिंदेवाही येथील स्मशानभूमी येथे नेण्यात येऊन त्यांना अनेकांनी श्रद्धाजंली वाहीली.
सुदामजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली वाहतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे हे होते तर' ॲड राम मेश्राम अभारिप चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविन खोब्रागडे अशोक निमगडे आरपिआय चे नेते बाबा जैस्वाल , रिपाईचे प्रा. मुनिश्वर बोरकर , मनोहरराव नन्नावरे , राजकुमार रामटेके ,, नागदेवते बाबु , डॉ . प्रेमलाल मेश्राम ' रिपाईचे जेष्ठ तेनेअशोक रामटेके , संतोष रामटेके ' राजपाल खोबागडे
, मुकुंदा गेडाम ' नंदु खोब्रागडे , सुर्यजित खोब्रागडे 'पाझारे मॅडम रमेश डोंगरे, आदिनी श्रद्धांजली वाहिली. गोपाल रायपुरे यांनी श्रद्धांजली वाहतांना म्हणाले की, रिपब्लिकन चळवळीत काम करतांना अन्याय सहन करावा लागतो परंतु अश्याही परिस्थितीत त्यांनी लढा दिला. हिरारीने भाग घेऊन त्यांनी चळवळी साठी मोलाचे योगदान लाभले त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांना श्रंधाजली अर्पण करतो.