पोंभुर्णा येथे संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन संपन्न.
एस.के.24 तास
पोंभुर्णा : मागील वर्षातील शेतक-यांच्या खरीप व रब्बी पिकांची फार मोठी नुकसान झाली होती.चौदा हजार शेतक-यांनी पीएम पिक विमा योजनेचा विमा काढलेला होता.नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाले तरीदेखील शासनाने व विमा कंपनीने विम्याचे पैसे दिले नाही. करीता शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात वकिलाच्या मार्फत कोर्टात केस दाखल केली. त्यामुळे शासन व विमा कंपनीला जाग आली.
यासाठी ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी पोंभुर्णा येथे शासनाचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.तसेच बेरोजगारी,आरोग्य,वाढती महागाई स्टॅम्प पेपर भाववाढ आदीं अनेक समस्या बाबत सुद्धा सरकारचा धरणे आंदोलनाद्धारे निषेध नोंदवण्यात आला.
धरणे आंदोलनात विचार मांडतांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत म्हणाले की,शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये.शेतकऱ्यांनाआपल्या न्याय-हक्कासाठी संघर्ष करुन न्याय मागावा लागत आहे ही मोठी शोकांतिका आहे.शेतकरी विरोधी, दडपशाही सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहन जनतेला केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी म्हणाले की भाजपच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.बांधकाम कामगारांना भांडे वाटप करण्याचा इव्हेंट बल्लारपूर येथे पालकमंत्र्याकडुन आयोजित करण्यात आला होता.बांधकाम कामगारांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पहाटे पाच वाजता पासुन लाईन मध्ये उभे केले मात्र भांडे वाटप केले नाही.
त्यामुळे बांधकाम कामगारात संतापाची लाट उसळली आणि पालकमंत्र्याविरोधात घोषणा बाजी होऊ लागली.चेंगराचेंगरीत अनेक कामगारांना दुखापत झाली तर एका महिलेचे हात मोडले या सर्व गोष्टीस पालकमंत्री सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
पालकमंत्री इव्हेंटबाज आहेत.भाजपच्या काळात फक्त,रस्ते,नाल्या,इमारती, बांधून पैसे लुटण्याचे काम केले गेले. आणि त्याचे इव्हेंट साजरे झालेत अश्या इव्हेंट मध्ये कामापेक्षा प्रसिद्धीचा ज्यास्त खर्च करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्र्याना घरी बसविण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी मुल तालुका काँग्रेस कॅमेटी अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी इंदिराजी,राजीवजी यांचे कार्य व योजना आणि वाढलेली महागाई यावर आपले मनोगत व्यक्त केले.शेतकऱ्यांच्या विविध मागण्या याबाबत सविस्तर प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे महासचिव ओमेश्वर् पद्मगीरवार यांनी केले संचालन धम्मा नीमगडे यांनी केले.
मंचावर तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव पाल,शहर अध्यक्ष अशोक गेडाम, महिला अध्यक्षा वैशाली बुरांडे, प्रिया पातळे,नगर सेवक नरेंद्र बुरांडे, मुल शहर अध्यक्ष पवन नीलमवार,दादा पाटील ठाकरे, श्री.गेडाम, दीऊ रणदिवे यांचेसह पोभूर्णा तालुका,शहर व ग्रामीण काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर शेतकरी व नागरिकांच्या समस्याच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार पोभूर्णा यांचे मार्फत नाम.मुख्यमंत्री यांना देण्यात आले.