बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा १४ ला छल्लेवाडा येथे.

बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा १४ ला छल्लेवाडा येथे.


 गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


अहेरी : पंचशिल बौद्ध समाज मंडळ छल्लेवाडा येथील बुद्ध विहारात तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा व धम्मदेशनाचा कार्यक्रम सोमवार दि. १४ ऑक्टोबर २०२४ ला सकाळी ९ वाजता पासुन ते दुपारी २ वाजतापर्यंत आयोजीत करण्यात आलेले आहे. 


तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा पुज्य भंदन्त अभय नायक नागपूर व तिस्स बोधी भन्तेजी नागपूर यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात येणार असुन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बबनराव राऊत माजी बॅक मॅनेजर आलापल्ली सामाजीक कार्यकर्ता शिलाताई ढोके 


शुशीला भगत , माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार , सेवानिवृत RFO हनुमंत मडावी , अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रिय उपाध्यक्ष रोहिदास राऊत' रिपब्लिकन पार्टी गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर रिपाई चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे आदिचे मार्गदर्शन लाभणार आहे. 


रात्रौ बुध्द' फुले -आंबेडकर यांच्या जिवनावरील भीम गिताचा तसेच दुय्यम कव्वालीचा सामना सुप्रशिद्ध गायक रमेश गायकांबळे तेलंगणा व सुप्रशिद्ध गायीका सिरिशा कदम तेलंगणा हे मंनोरंजन करणार आहेत. 


तरी सदर कार्यक्रमास हजारोंच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मनोहर भासारकर , उपाध्यक्ष विलास बोरकर सचिव लक्ष्मण जणगम सहसचिव प्रभाकर जुमडे , भगवान दुर्गे कोषाध्यक्ष प्रभाकर दुर्गे ' शंकर भसारकर , गुलाब देवगडे , राजाराम दुर्ग ' मल्लया बोरकर , सल्लागर अनमोल बोरकर सुनिल जणगम आदिनी केलेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !