आदिवासींचा जमिनी गैर आदिवासींच्या कब्ज्यातुन तात्काळ मुक्त करा. - जगदिशकुमार इंगळे यांची पत्रकार परिषद .
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - आदिवासी समाजावर अन्यायाचे प्रमाण वाढल आहेत. खऱ्या आदिवासींच्या जमिनी बळजबरीने बळकावून गैरआदिवासींच्या कब्ज्यात आहेत त्या जमीनी मुळ आदिवासींना परत कराव्यात या मागणीसाठी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेच्या पत्रकार परिषदेत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे संस्थापक जगदिशकुमार इंगळे यांनी मागणी केली.
मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील मय्यत पांडुरंग मडावी यांची मुळ जमिन व्यकंटराव गोविंदवार यांनी बळजबरीने पैश्याच्या भरोशावर आदिवासी कुटुंबाची दिशाभूल केलीच परंतु शासनाच्या डोळ्यात धुळ झोकून परस्पर फेरफार करून स्वताःच्या नावाचा सातबारा तयार केला व माझ्याच नावावर सातबारा असल्यामुळे माझे कुणीच काही बिघडवू शकत नाही असा आकस गोविंदवार कुटुंबीयाचा होता.
१९८० ला पांडुरंग मडावी यांच्या नावाने दफ्तरात नोंदविला असतांना कागदपत्राची हेराफेरी करून परस्पर आदिवासींच्या जमिनिवर कब्जा केला तो तात्काळ मुक्त करून पांडुरंग मडावी यांचे वारसदार रमेश पांडुरंग मडावी यांच्या नावाने मौजा लगाम येथील गट १६८ मधील २ हेक्टर १३ आर जमीन मुळ मालकास देण्यात यावी. अश्या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली व आदिवासी विभागीय सचिव नागपूर यांचेकडे देण्यात आली असुन फेरफार करणारा तलाटि
संध्या मुलचेरा साजा यांना निलंबित करावे अन्यता आम्ही आंदोलन करू अशा ईशाराही जगदिशकुमार इंगळे , मानिकराव शेडमाके , शामदादा कोलाम , डॉ .सुखदेव कांबळे , रमेश कुमरे ' पंकज खोब्रागडे , किशोर बारसा , बंडु चांदेकर , राजकुमार खुजुर व रमेश मडावी यांचे कंटुबियांनी पत्रकार परिषदेत उपस्थित राहुन मागणी केलेली आहे.