बाहेरील जिल्ह्यातील पात्र शिक्षक उमेदवारांना नियुक्ती पत्र द्या ; डीटीएड - बिएड बेरोजगारांचे आमरण उपोषण सुरू.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : गडचिरोली पेक्षा क्षेत्रातील गडचिरोली जिल्हा व बाहेरील जिल्ह्याच्या डीटीएड - बिएड झालेल्या बेरोजगारांना जिल्हा परिषद गडचिरोली तर्फे मुलाखत घेतली.
नंतर त्यांचे मुळ दस्ताऐवजाची तपासणी केली व फक्त गडचिरोली जिल्हयातीलय पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र ( आर्डर) दिलेत त्यामुळे बाहेरील जिल्हयातील पात्र शुशिक्षीत बेरोजगारांवर अन्याय झाला तेव्हा आम्हालाही नियुक्ती पत्र (आर्डर ) देण्यात यावे या मागणी साठी डीटीएड बिएड स्टुडंट् असोशिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे बेरोजगार विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत.
गडचिरोळी पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षक भरतीसाठी बाहेरील जिल्हयातील डीटिएड - बिएड पात्र उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगीतले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी अर्जाची छाणनी करून दि. ०४ / ०९ /२०२४ ला मुळ कागपत्राची पळताळनी साठी बोलाविले व दि . १०/ ०९ /२०२४ ला फक्त गडचिरोली जिल्हातील पात्र उमेद वारांची यादी लावली आम्हाला कोणत्याच प्रकारची पुर्व सुचना न देता वास्तविक जेवढ्या जागाची जाहिरात होती.
त्यापेक्षा अर्धाच जागाची निवड यादी लावली इतर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची निवड करायची नव्हती तर आमचे कागदपत्र तपासणीसाठी बोलावून आम्हाला मानसिक त्रास का दिला आम्ही आदिच बेरोजगार त्यातही पैसाचा त्रास तेव्हा आम्हालाही न्याय मिळावा आम्हालाही नियुक्ती पत्र घ्यावे या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषण पत्कारला व न्यायाची मागणी करीत आहोत.
उपोषणाला संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर , निलिमा चहांदे दिपिका मडावी , स्नेहा मेश्राम,लक्ष्मी वाढई , सोनाली रापल्लीवार वासुदेव सहारे,मोहन गायकवाड , पवण गंडाटे , सुरेश मांडले , सदानंद मंदे सुधिर मुनघंट्टीवार , गोपाल कुकडे , स्वनिल कोसे राकेश खोब्रागडे , कावेरी राऊत आदि सहीत बाहेरील जिल्हयातील बहुसंख्य सुशिक्षित बेरोजगार आजपासून उपोषणाला बसले आहेत.