सलग तिसऱ्यांदा तंटामुक्त अध्यक्ष होण्याचा विक्रम,चिचबोडी चे पुरुषोत्तम रायपूरे यांची पुन्हा बिनविरोध निवड.
सुदर्शन गोवर्धन ! ग्रामीण तालुका प्रतिनिधी सावली
सावली : सावली तालुक्यातील चीचबोडी ग्रामपंचायतीच्या माहे ऑक्टोंबरची ग्रामसभा सरपंच सतीश नंदगिरवार यांच्या अध्यक्षेखालील ग्रामपंचायतच्या भव्य आवारात दि.07/10/2024 नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली.यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदासाठी चीचबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री पुरुषोत्तम रायपूरे यांची सलग तिसऱ्या वर्षीही सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
पुरुषोत्तम रायपूरे हे गेली 2022 ते 2023 म्हणजे 2 वर्षे तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन गावाचा एकोपा निर्माण करण्याचे काम प्रामाणिकपणे करित आहेत.गावातील तंटे गावातच मिटविण्यात त्यांचा हातखंडा आहे.लहानापासून ते मोठ्यांपर्यंत व्यक्तीची मने जिंकण्याची त्यांच्याकडे उत्तम कला आहे.दुसऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होऊन मदतीला धाऊन जातात अशी त्यांची ओळख आहे.
सलग तिसऱ्यांदा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून निवडीमुळे सरपंच,सतीश नंदगिरवार, उपसरपंच प्रतिक पेंदाम, पोलीस पाटील केवळराम नैताम, ग्रामसेवक रवींद्र रायपुरे, जफरअली सय्यद,विश्वेश्वर पेंदाम, शामराव बाबनवाडे, दिपक कुरुडकर, किसन रोहनकर, डोमाजी शेंडे, बबन बोरसरे, ग्रामस्थ तसेच त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन करीत आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.