ने.हि.महाविद्यालयात कर्मयोगी मदनगोपालजी भैया जयंती कार्यक्रम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१०/१०/२०२४ येथील नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे संस्थापक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निस्सीम भक्त कर्मयोगी मदनगोपालजी भैया जयंती कार्यक्रम नुकताच नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात पार पडला.
यावेळी संस्थेचे सचिव मा.अशोक भैया, प्राचार्य डॉ डी एच गहाणे,उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी कर्मयोगी मदनगोपालजी भैयांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.यानंतर महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.राजेंद्र डांगे,डॉ रेखा मेश्राम,डॉ तात्या गेडाम, डॉ असलम शेख,डॉ धनराज खानोरकर
अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ मोहन कापगते,डॉ रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम, डॉ भास्कर लेनगुरे,डॉ किशोर नाकतोडे, डॉ मिलिंद पठाडे,डॉ अरविंद मुंगोले, डॉ हर्षा कानफाडे, डॉ पद्माकर वानखडे , डॉ वर्षा चंदनशिवे, डॉ कुलजित शर्मा,प्रा बालाजी दमकोंडवार, डॉ राजू आदे,प्रा आकाश मेश्राम,डॉ दर्शना उराडे,प्रा आनंद भोयर आणि डॉ हितेंद्र धोटे,प्रा संजय लांबे,संध्या मराठे, राजू मेश्राम,सुषमा राऊत,मोरु हटवार इत्यादींनी प्रतिमेला पुष्प वाहून आपली आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार समितीचे डॉ.युवराज मेश्रामांनी केले.यशस्वीतेसाठी डॉ.शर्मा,डॉ खानोरकर,प्रा धिरज आतला जगदिश गुरनुले,प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.