पोंभुर्णा येथे भारतीय ओबीसी महापरिषद कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न.
राहुल सोमनकार : तालुका प्रतिनिधी
पोंभुर्णा : ओबीसी च्या विविध मागण्या साठी चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय ओबीसी महा परिषदेच्या माध्यमातून ६ आक्टोबर ला बल्लारपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महापरिषद आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय ओबीसी महापरिषद चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष डॉ.संजय घाटे सर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पोंभुर्णा येथे कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. आढावा बैठकीचे अध्यक्ष स्थानीक मा. पाल महाराज तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.संजय घाटे सर,डॉ सातपुते श्री राहुल सोमनकर मंचावर उपस्थित होते.
ओबीसी ची जातिनिहाय जनगणना, ओबीसी वस्तीगृह, स्वाधार योजना, महाज्योती सारख्या योजना ओबीसी ना लागू झाल्यास विकास होईल.तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय ओबीसी महापरिषद कडून मुल - बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बहुजन उमेदवार निवडून दिला तरच आपल्या ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असे मत मा. पाल महाराज यांनी व्यक्त केले.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्याक उमेदवार निवडून जात आहे, या मतदारसंघात बहुजन समाजाची संख्या जास्त प्रमाणात असताना त्यांना संधी दिली जात नाही. त्यामुळे बहुजन -ओबीसी च्या समस्या विधानसभेत मांडण्यासाठी आपल्या ला बहुजन ओबीसी उमेदवाराला निवडून पाठविले पाहिजे असे मत डॉ. सातपुते व डॉ नैताम पॉम्भूर्ण यांनी मांडले.
मुल- बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत भारतीय ओबीसी महापरिषद कडून डॉ. संजय घाटे सर यांना उमेदवार म्हणून उभे करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकमताने सहमती दर्शवली , डॉ. संजय घाटे उच्चशिक्षित सर्जन असून इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष सुद्धा आहेत त्याची सामाजिक बांधिलकी व समाजात असलेले कार्य, बहुजन - ओबीसी साठी त्यांचा लढावू बाणा लक्षात घेऊन त्यांच्या पाठी मागे खंबीर पणे उभे राहण्याची व सहकार्य करण्याची शेकडो कार्यकर्ते यांनी शपथ घेतली.
या प्रसंगी,अमित पाल, देवराव सोनटक्के,मोरेश्वर अर्जुनकर, संजय ढोंगे,संजय वाढई,गौरव कुनघाडकर, पाल देव कोवे, रविंद्र बोंडे,अनिल येरमे, सागर गेडाम, आकाश टिकले,यमराज बोधलकर,भारत कुलमेथे, सुधीर गोवर्धन, विकास ठाकरे, रमेश नैताम,प्रशांत ठाकरे, राहुल सोमनकर उपस्थित होते.
आढावा बैठकीचे सुत्रसंचालन श्री,भुजंग ढोले प्रास्ताविक नंदूभाऊ बारसकर, तर आभार प्रदर्शन ओमदेव मोहुले यांनी केले.