देवी विसर्जनासाठी गेले होते दुगाळा ग्रा.पं.चे सदस्य,दिलीप सातपुते दिवस उलटून सुध्दा बेपत्ताच. ★ सरपंच प्रिती सातपुते व पोलिस प्रशासन यांची शोधकार्यासाठी धडपड.

देवी विसर्जनासाठी गेले होते दुगाळा ग्रा.पं.चे सदस्य,दिलीप सातपुते दिवस उलटून सुध्दा बेपत्ताच.


सरपंच प्रिती सातपुते व पोलिस प्रशासन यांची शोधकार्यासाठी धडपड.


मिथुन कलसार - ग्रामीण प्रतिनिधी,मुल


मुल : तालुक्यातील दुगाळा माल येथील प्रगतशील शेतकरी व दुगाडा ग्रामपंचायतचे सदस्य दिलीप सातपुते वय,42 वर्ष याचा गोसीखुर्द च्या नहरात दुर्गा देवी विसर्जन करीत असतांना पाण्याचा  मोठा प्रवाह व पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात वाहून गेल्याची घटना दि. 13 आक्टोंबर रविवारला सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास घडली सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

          

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ पोलिस चमू घटना स्थळी दाखल होत शोध कार्य सुरू केले. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बुडणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला नाही.शोधकार्याला अख दिवस लोटूनही उलटून सुद्धा शोध न लागल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 


परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चक दुगाडा ग्रामपंचायतच्या सरपंच प्रिती सातपुते व पोलिस प्रशासन कडून शोधकार्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत. गोसिखुर्दच्या विभागाशीही पाणी बंद करण्याची विनंती केली असल्याची माहिती समोर आली आहे पण दिवसाच्या कालावधी लोटूनही पाणी प्रवाह जैसेथेच आहे. 


त्यामूळे चिंता वाढत आहे मात्र बल्लारपूर विधानसभेसाठी उमेदवारीच्या इच्छुक यादीतील चेहरे मात्र याच विधानसभेतील एवढ्या मोठ्या घटनेची माहिती होऊन सुद्धा कुणी येथे भिरकले नाही व साधी कुटुंबीयांची भेट सुद्धा घेतली नसल्याने‌‌ अश्या असंवेदनशील राजकीय नेत्यांबद्दल गावात रोष व्यक्त होताना दिसत आहे. 


मात्र दुगाळा माल येथील संत जगनाडे महाराज यांचा सेवक,प्रगतशील शेतकरी व दुगाळा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या दिलीप सातपुते यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वना करण्यासाठी वेळ कुन्हा नेत्या व कार्यकर्त्यांना नसणे हि शोकांतिका असल्याची भावना समाज बांधव व गावकरी व्यक्त करीत आहेत. 


येथील बाकी पक्षांचे नेते सुद्धा या घटनेकडे पाठ दाखवलेले असल्याचे चित्र आहे कर्ता पुरूष पाण्यात वाहून गेल्याने घरी दुःखाचे वातावरण पसरले आहे. शोधकार्याची विणवणी प्रशासनाकडे कुटुंबीय करीत आहेत पण पोलिस विभाग वगळता कुणाकडूनही मदतकार्यासाठी मदत मिळाली नाही. दिवसभराचा कालावधी उलटूनही पाण्यात वाहून गेलेले ग्रामपंचायत सदस्य दिलीप सातपुते यांचा कुठेच शोध लागलेला नाही.


दि.13 आक्टोंबर रविवारीला सकाळी 11.00 वा.च्या सुमारास चक दुगाळा येथील महिला व पुरुष यांनी  दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दुर्गा देवीचे मोठ्या थाटामाटात वाजत गाजत मिरवणूक काढत गावा जवळून वाहत जाणाऱ्या गोसीखुर्द नहरात देवीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. सकाळी 11.00 वाजता च्या सुमारास कालव्यातील पाण्याचा मोठा प्रवाह  व पाण्याचा अंदाज न लागल्याने ग्रामपंचायत सदस्य व प्रगतशील शेतकरी दिलीप सातपुते हे पाण्यासोबत वाहून गेले असल्याची घटना घडली. 


दिलीप सातपुते हे दुगाळा माल येथील प्रगतशील शेतकरी व चक दुगाळा ग्रामपंचायत सदस्य आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, व दोन मुली,असा परिवार आहे.नहरात वाहून गेलेल्या दुगाडा माल येथील दिलीप सातपुते यांचा शोध मुल पोलिस प्रशासन घेत आहेत. मात्र पाण्याचा प्रवाह जैसे थे सुरू असल्याने दिवस लोटून रात्री झाली पण त्याचा पत्ता लागला नाही. पाण्याचा प्रवाह असल्याने सुद्धा शोधकार्यासाठी अडचण येत आहे.


मुल पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांचेशी संपर्क साधला असता चक दुगाळा येथील नागरिकांना सोबत घेऊन शोधकार्य सुरू असल्याचे    सांगितले. 

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !