विधी ऊरकुडे ची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०१/१०/२०२४ पूर्व विदर्भातील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या नेवजाबाई भैया हितकारीणी शिक्षण संस्थेच्या नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयात १२वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या विधी हेमंत ऊरकुडेने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व
जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर विभागीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धा ४५ सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली. आता ती क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती यांच्या आयोजनेत होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत भाग घेणार आहे.
विधीने आपल्या निवडीचे श्रेय मुख्य जलतरण प्रशिक्षक शिवराज मालवी, सुधीर मालवी,मोनाली ठेंगरे आणि आपल्या पालकांना दिले आहे.विधीच्या निवडीबद्दल नेवजाबाई भैया हितकारीणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया व सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. गहाणे आणि सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आणि राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.