अधीक्षक अभियंता कार्यालय गडचिरोली कार्यालय समोर अर्धनग्न आंदोलन बेमुदत ठिय्या आंदोलनाचा 9 वा दिवस.


अधीक्षक अभियंता कार्यालय गडचिरोली कार्यालय समोर अर्धनग्न आंदोलन बेमुदत ठिय्या आंदोलनाचा 9 वा दिवस.


एस.के.24 तास


गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली. मा.अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचा अंतर्गत कोर्ला ते किस्टयापल्ली,कोरची तालुक्यातील नाळेकल ते गांगीन तसेच करण्यात आलेल्या एकूण संपूर्ण कामांची चौकशी करून डांबरीकरना च्या कामात बोगस काम करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. 


असून यांस जबाबदार अभियंता यांना निलंबीत करून कंत्राटदारावर कायमस्वरूपी काळ्या यादीत समाविष्ट करून फोजदारी गुन्हा नोंद करा याकरिता दिनांक,26/09/2024 पासुन अधीक्षक अभियंता कार्यालय गडचिरोली यांचे कार्यालय समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु असून आंदोलनाच्या 9 व्या दिवशी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.


गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात अंतर्गत डांबरीकरणाची कामे चुकीच्या पद्धतीने कामाचा दर्जा अत्यन्त नित्कृष्ट दर्जाचा असल्यामुळे पावसाळा आला की कामे पूर्णपणे फुटून व वाहून सिरोंचा तालुक्यातील कोर्ला ते किस्टय्यापल्ली तसेच कोरची तालुक्यातील नाळेकल ते गांगीन हा रस्ता बांधकाम करीत असतांना कंत्राटदाराने अंदाजपत्रक डावलून काम केल्याचे दिसून येत आहे.


डांबराचे काम करण्यापूर्वी sqm, nqm यांनी तपासणी केली होती काय ? हा प्रश्न निर्माण होतो.जर sqm nqm  ने तपासणी केली असेल तर रस्ता फुटलाच कसा ?  कागदोपत्री रस्ता चौकशी केली असे दाखविण्यात येत आहे. कोणताही अभियंता कामावर जात नाही याचाच फायदा कंत्राटदार घेत असतो व असले बोगस कामे गडचिरोली जिल्ह्यात केले जात आहेत. अशा कंत्राटदारावर  फौजदारी कारवाई झाल्याशिवाय असले बोगस कामे बंद होणार नाहीत.


कंत्राटदाराने मातीवर डांबरचे काम केले आहेत. त्यामुळे रस्ता 4 महिन्यात पूर्णपणे फुटला याला सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते जबाबदार आहेत.विकासाच्या नावाखाली लूटमार सुरु आहे.  नियमबाह्य  व अंदाजपत्रक डावलून कामे गडचिरोली जिल्ह्यातच होत आहेत.


सिरोंचा तालुक्यातील कोर्ला ते किस्टय्यापल्ली व कोरची तालुक्यातील नाळेकल ते गांगीन या कामावरील कंत्राटदारावर तात्काळ फोजदारी गुन्हा नोंद करून कायमस्वरूपी काळ्या यादीत समाविष्ट करा तसेच कामावरील अभियंता,  उपअभियंता यांना तात्काळ निलंबीत करा.गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कोटीचे रस्त्याचे काम करण्यात आले करण्यात आलेल्या एकूण संपूर्ण कामांची तात्काळ चौकशी समिती गठीत करून चौकशी समिती आमच्या समक्ष संपूर्ण डांबरीकरणाच्या कामांची चौकशी करावी.


व दोषी कंत्राटदारस कायमस्वरूपी काळ्या यादीत समाविष्ट करा तसेच कामावरील अभियंता यांना तात्काळ निलंबीत करा.या मागणी साठी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली यांचे कार्यालय समोर दिनांक 26 /09/2024 पासुन बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहोत.याची नोंद घ्यावी,अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलनास 9 वा दिवस सुरू आहे.


आंदोलनकर्ते आंदोलनाच्या 9 व्या दिवशी आंदोलन तीव्र करत अर्धनग्न आंदोलन केले तसेच येत्या सोमवारला भीक मांगो आंदोलन करून शासन प्रशासनाचे लक्ष वेधनार आहेत.जो पर्यंत दोषी अभियंता यांचेवर निलंबनची कारवाही तसेच कंत्राटदारावर कायमस्वरूपी काळ्या यादीत समाविष्ट करणार नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहील असे आंदोलनकर्ते यांनी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.


आंदोलनकर्ते,योगाजी कुडवे,निलकंठ संदोकार,रघुनाथ सिडाम,जितू जांभूळकर,प्रभाकर लाडवे,आदी उपस्थित आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !