दर्यापूरची जागा रिपाईला सोडण्याच्या अटीवर आम्ही इंडिआ आघाडी सोबत अन्यता चंद्रपूर - गडचिरोली मधील 8 जागावर रिपाई उमेदवार उभे करणार.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
चंद्रपूर : अमरावती जिल्हयातील दर्यापूर ची जागा इंडिआ आघाडीने सोडल्या च्या अटिवर रिपाई चंद्रपूर गडचिरोली हि इंडिया आघाडी सोबत राहू शकतो अन्यता रिपाई चंद्रपूर व गडचिरोली विधानसभेच्या 8 जागेवर आपले स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्धार मराठी पत्रकार भवन चंद्रपूर येथे पार पडलेल्या रिपाईच्या महत्वाच्या नेत्यांनी केला आहे.
सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी रिपाई चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, गोपाल रायपूरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधान सभेची जागा रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.राजेंद्र गवई यांच्यासाठी इंडिआ आघाडी सोडत असेल (तशी इंडिआ आघाडी सोबत चर्चा सुरु आहे) तरच रिपाई कार्यकर्ते इंडिया आघाडीसोबत राहतील अन्यता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी,चंद्रपूर,बल्लारपूर,वरोरा व गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभेसाठी रिपाई आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहेत.
यात नो भाजपा नो कांग्रेस नो वंचित ओन्ली रिपब्लिकन . ब्रम्हपुरी विधानसभेसाठी कुणबी लांबीचे आबाजी समर्थ ' बल्लारसा अँड प्रियंका चव्हाण चंद्रपूर लाजर कांबळे , वरोरा अनिल वानखेडे तर आरमोरी कुमरे आदि जागेचे उमेदवारही फिक्स झाले असुन दि. २६ ला उमेदवारी अर्ज भरणार आहेत असे बैठकीत ठरविण्यात आले.
सदर बैठकीला प्रदेश महासचिप सिद्धार्थ सुमन ' चंद्रपूर जिल्हा महासचिव मोरेश्वर चंदनखेडे रिपाई नेत प्रा. मुनिश्चर बोरकर गडचिरोली चंद्रपुर जिल्हा कार्याध्यक्ष लाजर कांबळे, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष कोमल रामटेके , कोषाध्यक्ष गुरुदास रामटेके ' जिल्हा संघटक रविंद्र पाटील , माजी अध्यक्ष बाजीराव उंदिरवाडे , शहर अध्यक्ष भारत भुषण तावाडे ' बल्लारसा तालुकाध्यक्ष अजय चव्हाण , सावली तालुकाध्यक्ष किशोर उंदिरवाडे
राजुरा तालुकाध्यक्ष शामसुंदर मेश्राम , वरोरा तालुकाध्यक्ष अनिल वानखेडे , ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष विजय रामटेके भद्रावती तालुकाध्यक्ष संतोष रामटेके , चिमुर तालुकाध्यक्ष अँड. जयदेव मुन,पोभूर्णा तालुकाध्यक्ष रितिक वनकर , मुल तालुकाध्यक्ष उमेश खोब्रागडे,सिंदेवाही तालुकाध्यक्ष राजकुमार रामटेके,सावली तालुक्यातील लोमेश सोरते , देविदास भैसारे,भावे आदि रिपाईचे प्रमुख कार्यकर्ते बैठकीत प्रामुख्याने हजर होते .