चंद्रपूर मध्ये 7 लाख 58 हजार 96 रुपये चा अवैध सुगंधित तंबाखू जप्त ; एकला अटक.
एस.के.24 तास
चंद्रपूर :- ८ ऑक्टोबर ला पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून अवैधरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून स्थागुशा. येथिल अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. रामनगर हददीमध्ये पेट्रोलींग करीता असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली.
प्रेमकुमार बाबुराव बेले वय,50 वर्ष धंदा - पान मटेरीअल विक्री, दत्त नगर नागपुर रोड चंद्रपुर हा आपले पान मटेरियल दुकानात व घरी दत्त नगर नागपुर रोड ता.जि. चंद्रपुर येथील दुकानात अवैधरित्या सुगंधीत तंबाखु बाळगुण विक्री करीत आहे.
स्थानिक गुन्हे शाखा ॲक्शन मोड वर आले असून चंद्रपूर शहरातून ७ लाख ५८ हजार ९६ रुपये चा अवैध सुगंधित तंबाखू जप्त केले आहे. आरोपी विरूध्द पो.स्टे. रामनगर येथे अपराध कमांक ९३२/२०२४ कलम २२३,२७५,१२३ भारतीय न्याय संहिता २०२३, सहकलम ३०(२),२६(२) (प), २६(२) (पअ), ५९ अन्न सुरक्षा आणी मानके अधि गुन्हा नोंदकरण्यात आला आहे.
सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक,महेश कोंडावार यांचे मार्गदशनात पोउपनि,संतोष निभोरकर, पोउपनि, विनोद भुरले, पो.हवा. जयंत चुनारकर, नितेश महात्मे, चेतन गज्जलवार, पोअं.किशोर वाकाटे, अमोल सावे,प्रफुल गारघाटे, चापोहवा दिनेश उराडे यांनी केली आहे.