महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक च्या नेतृत्वामध्ये साखळी उपोषण तथा धरणे आंदोलनाचा 5 दिवस.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
मुंबई - महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक च्या नेतृत्वामध्ये आझाद मैदान येथे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तसेच 1000 रुपये मानधन वाढीसाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य सरचिटणीस कॉ विनोद भाऊ झोडगे यांच्या नेतृत्वात मुंबई मंत्रालय येथे श्रेष्ठ मंडळ पाठवण्यात आले.
मंत्रालय सचिव यांच्या सोबत चर्चा करण्यात आली कर्मचाऱ्यांचा जी आर काढावा या मागणीवर खंबीर राहून जीआर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे तरी महाराष्ट्रातील शालेय पोषन आहार कर्मचारी यांना सुचित करण्यात येते येत्या सोमवारला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यातील आझाद मैदान येथे विराट मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
एकच नारा जी आर काढा या विचाराने सर्व कर्मचाऱ्यांनी मुंबई आझाद मैदानावर यावे.या सरकारसोबत ही आखरीची लढाई आहे आणि आखरीचा क्षण कर्मचाऱ्यांनी सक्रिय व्हा आणि मोर्चा सामील व्हा असे आवाहनही विनोद झोडगे यांनी केले.