स्कूल बस पलटली 40 विद्यार्थी जखमी ; सर्वांची प्रकृती स्थिर.
एस.के.24 तास
गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे लालबहादुर शास्त्री विद्यालयाच्या शाळेची बस पलटल्याची घटना समोर आली आहे. आज दुपारी 12.45 वाजता,ही बस शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघाली असताना हरदोणा परिसरात हा अपघात घडला.
या बसमध्ये 40 विद्यार्थी प्रवास करत होते. घटनेनंतर तात्काळ पोलिस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे हलवण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांची स्थिती स्थिर असल्याचे सांगितले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुभाष घोटे रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते, ज्यांनी जखमींना आपली सहवेदना व्यक्त केली. आमदार घोटे यांनी सांगितले.
या दुर्घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही प्रशासनाकडे बसच्या सुरक्षेच्या निकषांची पुनरावलोकन करण्याची मागणी करू, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील." या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दु:खाची भावना आहे आणि सर्वजण जखमी विद्यार्थ्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून अपघाताचे कारण शोधले जात आहे.