चंद्रपूर ते गडचिरोली मार्गावरील वैनगंगा नदी आंतरजिल्हा बॉर्डरवर चेक पोस्टवर वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त.
एस.के.24 तास
सावली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.व्याहार्ड (खुर्द) येथे आंतरजिल्हा बॉर्डरवर लावण्यात आलेल्या एस.एस.टी.चेक पोस्टवर प्रतिबंधित 35 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली असून जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती वाढविण्यात आली आहे.
शुक्रवारी दि. 18 सकाळी आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी,जुगार प्रतिबंध, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु तसेच इतर अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्यासाठी सावली पोलिस स्टेशन परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत होते.यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर एक पांढरे रंगाची आयसर क्रमांक – सी.जी.- 07 सी.क्यु 4602 मधून
महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखु व पानमसाला या अन्नपदार्थाच्या विक्रीकरीता गडचिरोली ते चंद्रपूर अशी अवैद्यरित्या वाहतूक करणार आहे, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली.एसएसटी चेक पोस्ट व्याहाड (बुज) येथे नाकाबंदी करून सदर वाहनाची तपासणी केली.
यावेळी वाहनातून लोखंडी तारेच्या बंडल खाली लपवन ठेवलेला महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला मजा 108 संगधित हुक्का, शिशा तंबाखुचे 200 ग्रूम वजनाचे 1680 बॉक्स, 50 ग्रॅम वजनाचे 1800 बॉक्स एकूण किंमत 19 लक्ष 13 हजार 800 रुपये व वाहनाची किंमत 15 लक्ष रुपये असे एकूण 34 लक्ष 93 हजार 800 रुपयांचा माल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. जप्त वाहनाचे चालक
1) इरफान कुरेशी मुस्तफा कुरेशी वय, 27 वर्ष रा.भिलाई, छत्तीसगड 2) संतोप कुमार सुंदर सिंह वय,47 वर्ष रा.डिडरी,मध्यप्रदेश यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकेडवार करीत आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.भगत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकेडवार, संतोप निंभोरकर, पोलिस हवालदार चेतन गज्जलवार, नितेश महात्मे, किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघाटे, प्रमोद डबारे यांनी केली आहे.