राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते माजी मंत्री,बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 अज्ञातांनी गोळीबार करून केले ठार. ★ हरियाणा - यूपी कनेक्शन चा संशय ; 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात.

ब्रेकिंग न्युज...

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते माजी मंत्री,बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 अज्ञातांनी गोळीबार करून केले ठार.


हरियाणा - यूपी कनेक्शन चा संशय ; 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात.


एस.के.24 तास


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळीबार केला.लोकसभा निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दीकींनी काँग्रेसची साथ सोडली होती.बॉलिवूडमध्ये बाबा सिद्दीकी प्रसिद्ध होते. आज रात्री 8 : 00 च्या सुमारास वांद्रे येथील खेरवाडी जंक्शन जवळ बाबा सिद्दीकींवर तीन अज्ञातांनी गोळीबार केला.गोळीबारात बाबा सिद्दीकी जखमी झाले. लिलावती रुग्णालयात बाबा सिद्दीकींना दाखल करण्यात आलं. उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


वांद्रे सिग्नलवर नेमकं काय घडलं ?


बाबा सिद्दीकी  हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते.त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर  गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले. 


हे तीन लोक कोण होते ? ते अद्याप समजू शकलेलं नाही. बाबा सिद्दीकींवर कुणी गोळीबार केला ? त्यामागचं कारण काय होतं? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सदरची माहिती प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना दिली.


बाबा सिद्दीकींवर तिघांकडून गोळीबार : -


बाबा सिद्दीकी  यांना गोळ्या लागल्या. त्यांना गोळ्या लागल्यानंतर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर विरोधी पक्षाकडून गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 


बाबा सिद्दीकी हे माजी मंत्री होते : - 


बाबा सिद्दीकी गोळीबारात गंभीर जखमी झाले होते त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्थानिक पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.बाबा सिद्दीकी माजी आमदार आणि मंत्री होते. 


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी ओळखले जात असत. त्या पार्ट्यांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त यांच्यासारखे बॉलिवूड स्टार्स जात असत. बाबा सिद्दीकी यांनी सुनील दत्त यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आहे ?


बाबा सिद्दीकींवर प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातला एक हरियाणाचा आहे. तर दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. 

मुंबई पोलीस सक्षमपणे काम करत आहेत. कुणीही आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !