मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा. - 2
★ नेवाजाबाई हितकरिनी विद्यालय नागपूर विभागात प्रथम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : या उपक्रमाअंतर्गत सन 2024-25 मध्ये नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरीने नागपूर विभागातून खाजगी व्यवस्थापनाच्या गटातून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या उपक्रमाचा गौरव सोहळा व पारितोषिक वितरण सोहळा मुंबई येथील एन.सी.पी.ए. च्या भव्य सोहळ्यात सन्माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे तथा शिक्षणमंत्री श्री.दीपक केसरकर तथा शिक्षण आयुक्त श्री.सुरज मांढरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा शिक्षक यांनी विद्यालयाच्या वतीने गौरव चिन्ह आणि 21 लाख रुपयाचे पारितोषिक सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते स्वीकार केले.
प्राप्त केलेल्या या सन्मानाने सर्व स्तरातून नेवजाबाई हितकारीणी संस्था,ब्रह्मपुरी चे अभिनंदन केल्या जात आहे.